Pakistan Returnees Fatal Crash Dainik Gomantak
ग्लोबल

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

Pakistan Returnees Fatal Crash: पाकिस्तानमधून जबरदस्तीने हाकलून लावल्यानंतर आपल्या मूळ गावी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांच्या एका ट्रकचा भीषण अपघात झाला.

Manish Jadhav

Afghan Refugees Truck Accident: अफगाणिस्तानातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली. पाकिस्तानमधून जबरदस्तीने हाकलून लावल्यानंतर आपल्या मूळ गावी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांच्या एका ट्रकचा भीषण अपघात झाला. हा भरधाव ट्रक महामार्गावर उलटल्याने तब्बल 18 निर्वासितांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर 35 हून अधिक जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी टाहो फुटला.

स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पाकिस्तान सरकारने बेकायदेशीर निर्वासितांवर सुरु केलेल्या कठोर कारवाईनंतर हे सर्वजण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत अफगाणिस्तानात परतत होते, मात्र मायभूमीत पाऊल ठेवण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने झडप घातली.

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, हा भीषण अपघात पूर्व अफगाणिस्तानमधील एका मुख्य महामार्गावर शनिवारी घडला. लघमान प्रांतातील काबुल आणि नंगरहार प्रांताला जोडणाऱ्या हायवेवर निर्वासितांनी खचाखच भरलेला एक ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. हा अपघात (Accident) इतका भीषण होता की ट्रकमधील अनेक जण खाली चिरडले गेले. मृतांमध्ये सर्वाधिक संख्या निष्पाप मुले आणि महिलांची आहे.

प्रांतीय राज्यपालांचे प्रवक्ते अब्दुल मलिक नियाजई यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये 10 लहान मुले आणि 5 महिलांचा समावेश आहे. अपघातातील सर्व जखमींना उपचारासाठी नंगरहार प्रांतातील विविध रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले असून, काहींची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. तालिबान सरकारचे मुख्य प्रवक्ते झबिहुल्लाह मुजाहिद यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून पीडित कुटुंबांप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या.

हे सर्व प्रवासी त्या हजारो अफगाण नागरिकांपैकी होते, ज्यांना नुकतेच पाकिस्तान सोडण्यास भाग पाडले गेले होते. पाकिस्तान सरकारने 2023 मध्ये देशातील बेकायदा स्थलांतरितांविरुद्ध मोठी मोहीम उघडली. तेव्हापासून लाखो अफगाणी नागरिकांना एकतर पाकिस्तानातून हाकलून देण्यात आले किंवा त्यांना देश सोडण्यास मजबूर केले गेले. याच काळात इराणनेही अफगाण निर्वासितांची हकालपट्टी करण्याची प्रक्रिया वेगवान केली. यामुळे गेल्या काही महिन्यांत लाखो अफगाण नागरिक दोन्ही देशांतून आपल्या मायदेशी परतत आहेत.

विशेष म्हणजे, यामध्ये अशा अनेक लोकांचा समावेश आहे ज्यांचा जन्म पाकिस्तानात झाला होता आणि ज्यांनी तिथे अनेक दशके राहून कष्ट केले होते. सर्वकाही गमावून मायदेशी परतणाऱ्या या असहाय्य लोकांच्या झालेल्या अपघातामुळे संपूर्ण परिसरात आणि निर्वासितांच्या छावण्यांमध्ये शोककळा पसरली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

डिचोली, कारापूर, मये, साळमध्ये 'कोकम' व्यवसायाची लगबग; यंदाही आमसुले होणार 'आंबट', 40% पीक वाया; पावसावर दरवाढ अवलंबून

"तो लहान मुलगा नाही, तो एक वादळ आहे!" WWEच्या रिंगणात वैभव सूर्यवंशीची दहशत! दिग्गज फायटरने टेकले गुडघे Watch Video

Illegal Cattle Slaughter Goa: सुरावलीत गुपचूप चालली होती जनावरांची बेकायदेशीर कत्तल, कर्नाटकच्या दोघांना रंगेहाथ पकडलं; गोवा पोलिसांची धडक कारवाई

SCROLL FOR NEXT