Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

Pakistan-Afghanistan War 2025: पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या हल्ल्यात एकूण आठ अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला.
Pakistan-Afghanistan War
Pakistan-Afghanistan WarDainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तानसाठी १८ ऑक्टोबर हा दिवस अत्यंत दुःखद ठरला. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या हल्ल्यात एकूण आठ अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला, ज्यात तीन तरुण क्रिकेटपटूंचा समावेश आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने याची पुष्टी केली असून, मृत क्रिकेटपटू कबीर आघा, सिबगतुल्लाह आणि हारून होते. या हल्ल्याने देशात आणि खेळाडू समुदायात मोठा खळबळ उडाली आहे.

अफगाणिस्तानचे माजी कर्णधार करीम सादिक यांनी या हल्ल्याचे कठोरपणे निषेध केला. त्यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, "हा हल्ला अत्यंत भ्याड आहे. ज्यांनी आपले प्राण गमावले, ते अफगाण क्रिकेटचे भविष्य होते. पाकिस्तान क्रिकेट नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक निष्पाप नागरिक आणि युवा क्रिकेटपटूंना आपले प्राण गमवावे लागले."

Pakistan-Afghanistan War
Goa Crime: जॉब देतो सांगून केला लैंगिक अत्याचार, व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची दिली धमकी; 40 लाखही उकळले

करीम सादिक यांनी पुढे स्पष्ट केले, "ज्या प्रकारे भारताने आशिया कपमध्ये पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळले, त्याचप्रमाणे अफगाण संघही पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणार नाही. आम्ही क्रिकेटच्या माध्यमातून प्रेम आणि मैत्रीचा संदेश देतो. रात्रीच्या वेळी गेस्टहाऊसमध्ये जेवणाऱ्या खेळाडूंवर झालेला हा हल्ला अत्यंत दुःखद आहे. तुम्हाला वाटतं का मी दहशतवादी आहे? रशीद खान दहशतवादी आहे का? आम्ही पठाण आहोत आणि आमचा धर्म प्रेमाचा आहे."

करीम व्यतिरिक्त, स्टार स्पिनर रशीद खान, फजलहक फारुकी आणि गुलबदीन नायब यांसह अनेक अफगाण खेळाडूंनीही नागरिकांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले आणि पाकिस्तानवर टीका केली आहे. अफगाणिस्तानमध्ये या हल्ल्यामुळे सुरक्षा आणि क्रिकेट समुदायावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Pakistan-Afghanistan War
Goa Crime: जॉब देतो सांगून केला लैंगिक अत्याचार, व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची दिली धमकी; 40 लाखही उकळले

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने या हल्ल्याचे गांभीर्य अधोरेखित करत, तरुण क्रिकेटपटूंना होणाऱ्या धोका आणि देशातील असुरक्षित परिस्थितीची तक्रार जागतिक स्तरावर करण्याची गरज व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com