Pakistan Afghanistan War: पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर 'एअरस्ट्राईक'; 72 तालिबानी ठार, 120 हून अधिक जण जखमी Watch Video

Pakistan Afghanistan Airstrike: गेल्या काही दिवसांपासून ड्युरंड लाईनवर सुरू असलेल्या तणावाचे रूपांतर आता भीषण संघर्षात झाले आहे.
Pakistan Afghanistan War
Pakistan Afghanistan WarDainik Gomantak
Published on
Updated on

इस्लामाबाद/काबूल: गेल्या काही दिवसांपासून ड्युरंड लाईनवर सुरू असलेल्या तणावाचे रूपांतर आता भीषण संघर्षात झाले आहे. अफगाणिस्तानने केलेल्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देताना पाकिस्तानी हवाई दलाने अफगाणिस्तानच्या हद्दीत घुसून जोरदार बॉम्बफेक केली. या हवाई हल्ल्यात ७२ तालिबानी सैनिक ठार झाले असून १२० हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या कारवाईमुळे दोन्ही देशांतील संबंध कमालीचे ताणले गेले असून सीमेवर युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

काबूल आणि कंदाहारमध्ये विमानांचा थरार

पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी मध्यरात्री पाकिस्तानी लढाऊ विमानांनी अफगाणिस्तानची राजधानी काबूलसह कंदाहार आणि पक्तिया प्रांतातील तालिबानी लष्करी तळांना लक्ष्य केले. रात्रीच्या अंधारात झालेल्या या स्फोटांच्या आवाजाने काबूल शहर हादरून गेले होते. पाकिस्तानच्या या कारवाईत तालिबानचे अनेक महत्त्वाचे लष्करी तळ उद्ध्वस्त झाले आहेत. अनेक निवासी भागांतही या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याचे समजते.

Pakistan Afghanistan War
Goa Politics: सावंतांबद्दल काही बरळाल तर खबरदार! केतन भाटीकरांना इशारा; फोंड्यातील भाजप नेते आक्रमक

आधी अफगाणिस्तानने केला होता हल्ला

या संघर्षाची ठिणगी २२ फेब्रुवारी रोजी पडली होती. अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या सीमावर्ती चौक्यांवर जमिनीवरून हल्ला चढवला होता. या हल्ल्यात तालिबानने पाकिस्तानच्या काही चौक्यांवर ताबा मिळवल्याचा आणि पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्याचा दावा केला होता. याच हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने 'काउंटर अटॅक' करत थेट हवाई हल्ल्याचा मार्ग निवडला. पाकिस्तानचे माहिती मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी या हल्ल्याची पुष्टी करताना सांगितले की, "आमच्या सैनिकांवरील हल्ल्याचा हा चोख बदला आहे आणि यापुढेही प्रत्येक हल्ल्याला असेच प्रत्युत्तर दिले जाईल."

Pakistan Afghanistan War
Goa Milk Price: दुधावरील आधारभूत किंमत वेळेत द्या! उत्तर गोवा दूध उत्पादक शेतकरी संघटनेची सरकारकडे मागणी

ड्युरंड लाईनवरून पुन्हा वाद उफाळला

दुसरीकडे, अफगाणिस्तानने पाकिस्तानचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ड्युरंड लाईन ही अवैध सीमा असल्याचे तालिबानचे म्हणणे आहे. पाकिस्तान या सीमेचा वापर करून अफगाणिस्तानमध्ये अवैध घुसखोरी करत असल्याचा आरोप अफगाण सरकारने केला आहे. सध्या अफगाणिस्तानने त्यांच्या बाजूने झालेल्या जीवितहानीचा अधिकृत आकडा जाहीर केला नसला तरी, पाकिस्तानने ७० हून अधिक तालिबानी मारल्याचा दावा ठामपणे केला आहे. या हवाई हल्ल्यांनंतर अनेक ठिकाणी भीषण आग लागल्याच्या चित्रफितीही समोर येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com