Afghanistan Floods: अफगाणिस्तानमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या विनाशकारी पुरात 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तरेकडील बागलान प्रांतात पुरामुळे 1000 हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या खाद्य संस्थेने शनिवारी सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. देशाच्या उत्तरेकडील भागाला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे.
दरम्यान, शुक्रवारी सर्वात जास्त प्रभावित बागलान प्रांतात 50 लोकांचा मृत्यू झाला. सरकारी प्रसारमाध्यमांनी बागलानच्या शेजारील तखार प्रांतात 20 लोक मारले गेल्याचे वृत्त दिले. तालिबान सरकारचे मुख्य प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी सांगितले की, विनाशकारी पुरामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक लोक जखमी झाले आहेत.
दुसरीकडे, बदख्शान, बागलान, घोर आणि हेरातला सर्वाधिक फटका बसला आहे. मुजाहिद यांनी पुढे सांगितले की, सरकारने लोकांना वाचवण्यासाठी, जखमींना नेण्यासाठी आणि मृतदेह शोधण्यासाठी सर्व उपलब्ध साधनांचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत. तर संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, देशाच्या हवाई दलाने बागलानमधील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरु केले आहे. पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यात आले असून जखमींना परिसरातील लष्करी रुग्णालयात नेण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.