A two-year-old baby kisses his mother's grave and says hi mom... Watch the emotional video Instagram, @adventureswithgrandmama
ग्लोबल

Viral Video: आईच्या कबरीचे चुंबन घेत दोन वर्षाचा चिमुकला हळूच म्हणतो... पाहा भावूक व्हिडिओ

Mother And Son:व्हिडिओ शेअर करताना लिसा मार्सल यांनी कॅप्शनमध्ये लिहिले 'आज आम्ही तिच्यासाठी सनफ्लॉवर आणि ट्यूलिपची फुले आणली आहेत जी वसंत ऋतूच्या ताज्या फुलांप्रमाणे टिकतील.'

Ashutosh Masgaunde

A two-year-old baby kisses his mother's grave and says hi mom... Watch the emotional video:

आई आणि मुलाच्या नात्यापेक्षा या जगात दुसरे सुंदर काहीच नाही. अशा स्थितीत त्यांचे एकमेकांपासून वेगळे होणे एखाद्या मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नाही, परंतु निसर्गाविरुद्ध कोणीही जाऊ शकत नाही हे मात्र खरे आहे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, अंदाजे 2 वर्षांचा एक लहान मुलगा सायकल चालवत येतो आणि एका कबरीजवळ थांबतो. त्याच्या सायकलवर बसून तो रडतो आणि म्हणतो, हाय आई. यानंतर तो कबरीच्या दगडाचे चुंबन घेत पुढे सरकतो. यावरून दिसते की, हा चिमुकला आपल्या आईला किती मिस करतो.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर लिसा मार्शल नावाच्या महिलेने @adventureswithgrandmama नावाच्या पेजवरून शेअर केला आहे.

लिसा मार्शल यांनी 2022 मध्ये आपल्या मुलीला गमावले. लिसा या चिमुकल्याची आजी आहेत. तर बाळाचे नाव लोचलान आहे.

व्हिडिओ शेअर करताना लिसा मार्सल यांनी कॅप्शनमध्ये लिहिले 'आज आम्ही तिच्यासाठी सनफ्लॉवर आणि ट्यूलिपची फुले आणली आहेत जी वसंत ऋतूच्या ताज्या फुलांप्रमाणे टिकतील.'

लिसा त्यांचा नातू लोचलानसोबतच राहतात आणि मुलीचे निधन झाल्यापासून त्याचे संगोपन करत आहेत.

लिसा त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर लोचलानचे खोडकर व्हिडिओ सतत शेअर करत असतात. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ 7 दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला होता आणि ही बातमी लिहिपर्यंत तो 4 कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि 26 लाख 40 हजार लोकांनी त्याला लाइक केले आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर इन्स्टाग्रामवरील अनेक यूजर्स भावूक झाले. कमेंट करताना एका यूजरने लिहिले, "हे खूप दुःखद आहे, देव मुलाला शक्ती देवो."

दुसऱ्याने लिहिले, "हा व्हिडिओ पाहून माझे हृदय पिळवटून गेले." तर तिसऱ्याने लिहिले, "त्या मुलाची आई नेहमी त्याच्यासोबत असेल. आजपर्यंत मी इतका दुःखद व्हिडिओ कधीच पाहिला नाही."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारतीय तटरक्षक दलाला सलाम...! अरबी समुद्रात बहादुरी गाजवत ईराणी मच्छीमाराला यशस्वीरित्या वाचवले; गोव्यात यशस्वी उपचार VIDEO

Mumbai Children Kidnap Case: मुले आरोपी रोहित आर्यच्या जाळ्यात नेमकी कशी अडकली? धक्कादायक घटनेची A टू Z कहाणी

Goa Crime: पेडणे गोळीबार घटनेला मोठे वळण! तेरेखोल नदीतील अवैध वाळू उपसा प्रकरणी 7 जणांना अटक

Viral Video: अंगावर चिखल उडवणाऱ्या कारचालकाची तरुणीनं मोडली चांगलीच खोड; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, 'भावाने चुकीच्या व्यक्तीशी पंगा घेतला...'

अंधाऱ्या रात्रीत डिव्हायडरजवळ पडला, दारूच्या नशेत उठणंही होतं मुश्किल; 'बिट्स पिलानी'च्या विद्यार्थ्याचा राडा

SCROLL FOR NEXT