Crime News
Crime NewsDainik Gomantak

Bihar Crime: इन्स्टाग्रामवरील प्रेमाची किंमत तब्बल 50 लाख; प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रियकराचे अपहरण

Crime News: बिहारमध्ये सध्या विचित्र प्रेमाची आश्चर्यकारक प्रकरणे समोर येत आहेत. नुकतीच एक मुलगी तिच्या प्रियकरासह पळून गेली.
Published on

Bihar Crime: बिहारमध्ये सध्या विचित्र प्रेमाची आश्चर्यकारक प्रकरणे समोर येत आहेत. नुकतीच एक मुलगी तिच्या प्रियकरासह पळून गेली. प्रियकराकडे फक्त हजार रुपये होते. हजार रुपये संपले तेव्हा त्याचे प्रेमही संपुष्टात आले होते.

आता बिहारमधील गया येथे राहणाऱ्या 18 वर्षीय मुलाची एका मुलीशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. यानंतर दोघांनी गप्पा मारायला सुरुवात केली.

त्यानंतर शुक्रवारी मुलीने मुलाला पाटण्यात भेटण्यासाठीही बोलावले. तेव्हापासून मुलगा बेपत्ता आहे. दुसऱ्या दिवशी त्याच्या फोनवरुन त्याच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांचा खंडणीचा कॉल आला.

दरम्यान, तेव्हापासून त्याचा मोबाईल स्वीच ऑफ आहे. मुलाच्या कुटुंबीयांनी गयाच्या बेलागंज पोलिस (Police) ठाण्यात याबाबत तक्रार केली आहे. घटनेचे गांभीर्य पाहून गयाचे एसएसपी आशिष भारती यांनीही बेलागंज गाठले आणि तरुणाच्या कुटुंबीयांकडून या प्रकरणाची चौकशी केली.

Crime News
Bihar Crime: धक्कादायक! 14 वर्षीय मुलीवर बलात्कार, पंचायतीच्या निर्णयानंतर वडिलांची पोलिसांकडे धाव

संपर्कानंतर मोबाईल बंद

गया येथील सेवानिवृत्त पशुवैद्य डीएन चौधरी यांच्या नातवाचे अपहरण करुन नंतर 50 लाखांची खंडणी मागितल्याचे प्रकरण समोर आले आहे.

पशुवैद्यकाचा 18 वर्षीय नातू ऋषभ शुक्रवारी त्याच्या इंस्टाग्रामवर मैत्री झालेल्या मुलीला भेटण्यासाठी गयाहून पाटण्याला निघाला होता, त्यानंतर तो घरी परतला नाही.

वास्तविक, ऋषभची इन्स्टाग्रामवर एका मुलीसोबत ओळख झाली होती. त्यानंतर तो तिच्याशी बोलू लागला होता. शुक्रवारी तो त्याच्या दुचाकीवरुन पाटण्याला निघाला. रात्री घरी परतणार असल्याचे त्याने कुटुंबीयांना सांगितले होते.

त्याच्यासोबत त्याचे काही मित्रही होते. पाटण्याजवळील संपतचकपर्यंत त्याचा मोबाइल सुरु होता. त्यानंतर स्वीच ऑफ आला.

Crime News
Bihar Crime: बिहारमध्ये खाकीला मोठा डाग, महिलेला ओलिस ठेवून पोलिस प्रमुखाने केला 8 दिवस बलात्कार

पाटण्याआधी मुलीला भेटलो

त्याच्या मित्रांनी सांगितले की, ऋषभची भेट संपतचक येथील इन्स्टाग्राम (Instagram) गर्लशी झाली होती. त्यानंतर ते दोघे कुठेतरी निघून गेले. शनिवारी नातेवाईकांना ऋषभच्या फोन नंबरवरुन फोन आला की, त्याच्या सुरक्षित परतीसाठी 50 लाख रुपये द्यावे लागतील.

नातेवाइकांनी पैसे कुठे द्यायचे, अशी विचारणा केली असता फोन बंद आला. त्यानंतर कुटुंबीयांनी बेलागंज पोलीस ठाणे गाठले. याची माहिती बेलागंज पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे.

यासोबतच तरुणांच्या शोधासाठी तांत्रिक पथकाचीही मदत घेतली जात आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पोलिस हे प्रेमप्रकरणाशी संबंधित असल्याचे सांगत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com