America Crime: अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीवर पुन्हा हल्ला; रेस्टॉरंटबाहेर हाणामारीत मृत्यू

Indian Origin Man Dies In America: अमेरिकेत पुन्हा एकदा भारतीय वंशाच्या व्यक्तीवर हल्ला झाला आहे. डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.
America Shootout News
America Shootout NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Origin Man Dies In America: अमेरिकेत पुन्हा एकदा भारतीय वंशाच्या व्यक्तीवर हल्ला झाला आहे. डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या मृत व्यक्तीचे वय 41 वर्षे आहे. हाणामारीत त्याच्या डोक्याला मार लागला. ही घटना 2 फेब्रुवारी रोजी पहाटे 2 वाजता (यूएस स्थानिक वेळेनुसार) वॉशिंग्टन डाउनटाउनमधील एका रेस्टॉरंटच्या बाहेर घडली होती. यासह अमेरिकेत भारतीयाच्या हत्येची ही पाचवी घटना ठरली आहे. विवेक चंदर तनेजा असे मृताचे नाव असून ते व्हर्जिनियामध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होते. या प्रकरणी मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक तनेजा ही भारतीय वंशाचा व्यक्ती व्हर्जिनियामध्ये राहत होती. 2 फेब्रुवारी रोजी ते 2 सिस्टर्स नावाच्या जपानी रेस्टॉरंटमध्ये होते. त्याचदरम्यान एका संशयिताने त्यांच्यावर हल्ला केला, असे वॉशिंग्टन पोस्टने पोलिसांच्या अहवालाचा हवाला देत म्हटले.

America Shootout News
Iran-America Tensions: ''आम्ही युद्ध सुरु करत नाही, पण...''; इराणने पुन्हा भरला अमेरिकेला दम

दरम्यान, अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरिकांवर हल्ले होत असताना हे प्रकरण समोर आले आहे. 41 वर्षीय विवेक तनेजा रात्री 2 वाजता रेस्टॉरंटमधून बाहेर पडले होते. रेस्टॉरंटजवळील रस्त्यावर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. पोलिसांच्या अहवालानुसार, हा हल्ला का झाला याबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. हल्ल्यानंतर विवेक बेशुद्ध अवस्थेत होते. पोलिसांना विवेक तनेजा रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेला दिसले. पोलिसांनी तात्काळ तनेजा यांना रुग्णालयात दाखल केले.

America Shootout News
America Crime News: अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये बंदूकधाऱ्यांची दहशत, रॅपिड फायरिंगमध्ये 4 जणांचा मृत्यू

आरोपी सीसीटीव्हीत दिसले

पोलिसांनी सांगितले की, विवेक यांचा बुधवारी रुग्णालयात मृत्यू झाला. सध्या पोलीस सीसीटीव्हीत कैद झालेल्या संशयिताचा शोध घेत आहेत. त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. श्रेयस रेड्डी बेनिगर, यूएस पासपोर्ट असलेला 19 वर्षांचा विद्यार्थी गेल्या आठवड्यात मृतावस्थेत आढळून आला होता. याशिवाय, या आठवड्याच्या सुरुवातीला नील आचार्य हा भारतीय विद्यार्थी मृतावस्थेत आढळला होता. यापूर्वी, 16 जानेवारीला हरियाणातील विवेक सैनी या 25 वर्षीय विद्यार्थ्याला जॉर्जियातील लिथोनिया येथे एका व्यक्तीने बेदम मारहाण केली होती. सध्या अमेरिकन पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com