Cruise Ship With 800 Corona cases Dainik Gomantak
ग्लोबल

Cruise Ship With 800 Corona cases: ऑस्ट्रेलियात हॉलिडे ट्रिपवर असलेल्या क्रुझमध्ये 800 कोरोनारूग्ण

जहाज सिडनीत थांबवले; एकाच दिवसात आढळले 8000 हून अधिक कोरोना रूग्ण

गोमन्तक डिजिटल टीम

Cruise Ship With 800 Corona cases: ऑस्ट्रेलियात एकात दिवसात 8 हजाराहून अधिक कोरोनारूग्ण आढळून आले आहेत. त्यातच येथील एका हॉलिडे क्रुझमध्येही सुमारे 800 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे ही क्रुझ आता मध्येच थांबविण्यात आली आहे. ही क्रुझ न्युझीलंडहुन रवाना होणार होती. कार्निव्हल ऑस्ट्रेलियाचे हे मॅजेस्टिक प्रिन्सेस क्रुझ सिडनी बंदरावर थांबविण्यात आले आहे.

या क्रुझमध्ये एकुण 4600 प्रवासी होते. दरम्यान, कोरोनाच्या अचानकपणे वाढलेल्या या आकड्यामुळे आता ऑस्ट्रेलियातील प्रशासनाचे टेनशन वाढले आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी कोरोनाची ही स्थिती सध्या टियर ३ टप्प्यातील असल्याचे म्हटले आहे. यातून केवळ मोठ्या प्रमाणात संसर्गाचा संकेत मिळू शकतो.

ही क्रुझ 12 दिवसांच्या ट्रिपवर होती. पण 800 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर क्रुझवर हडकंप माजला. त्यानंतर प्रवाशांसाठी प्रोटोकॉल बनविण्यात आले आहेत. तसेच या प्रवाशांना बाहेर कसे काढायचे यावर विचार केला जात आहे. सध्या कोरोना रूग्णांचे विलगीकरण केले जात आहे. त्यांच्या आरोग्य कर्मचारी नेमण्यात आले आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियातील बहुतांश कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंट आढळून आला आहे.

भारताच्या कोरोनास्थितीचा विचार केला असता देशात सध्या सक्रीय कोरोनाग्रस्तांची म्हणजेच ज्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे, अशा कोरोनारूग्णांची संख्या केवळ 12 हजार 553 राहिली आहे. भारतात आत्तापर्यंत कोरोनाने 5 लाख 30 हजार 528 मृत्यू झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हॉटेलच्या इमारतीवरून पडून 18 वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू, वागातोरमध्ये मध्यरात्री दुर्घटना; पोलीस तपास सुरू

Goa Crime: बेपत्ता अल्पवयीन मुलीच्या शोधात गोवा पोलिसांनी गाठले रायचूर, सुखरुप सुटका करत संशयिताला ठोकल्या बेड्या; पुढील तपास सुरु

Viral Post: भारतातच नाही तर थेट बलोचमध्येही 'खन्नाची हवा'; दिग्गज नेते झालेत फॅन, म्हणाले "हा तर हुबेहूब..."

अग्रलेख: हडफड्याच्या अग्निकांडाचा उगम कझाकस्थानात? कझाकी नर्तिकेचं नृत्य नसतं तर क्लबला आग लागली नसती?

Goa Live News: फोंडा राजकारणात मोठा ट्विस्ट; डॉ. केतन भाटीकर आणि कार्यकर्त्यांचा मगोपला 'राम राम'

SCROLL FOR NEXT