Viral Post Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Post: पाच रुपयांना मिळणाऱ्या पारले बिस्किटसाठी गाझापट्टीत मोजावे लागतायेत 2,342 रुपये; एका बापाच्या पोस्टने नेटकरी हळहळले

Viral Social Media Post: मोहम्मद यांनी त्यांच्या लाडक्या मुलीसाठी तिचे आवडते पारले बिस्कीट खरेदी केली आणि ती मुलगी बिस्कीट खात असतानाचा एक फोटो आणि व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

गेल्या दीड वर्षापासून इस्त्राईल आणि हमास यांच्यात युद्ध सुरु आहे. ही युद्ध समाप्ती होण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीयेत. युद्धात गाझा पट्टीतील नागरिकांंना मोठा फटका बसला आहे. येथील नागरिकांना भीषण अन्न टंचाईचा सामना करावा लागत आहे. अशात एक्सवरील एका पोस्टमुळे नेटकरी चांगलेच हळहळले आहेत. या पोस्टमुळे येथील अन्न टंचाई आणि महागाई याचे चित्र समोर आले आहे.

गाझा येथील युद्ध प्रभावित भागातील एका व्यक्तीने आपल्या मुलीसाठी खरेदी केलेल्या बिस्किटची पोस्ट एक्सवर शेअर केली आहे. या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. गाझा येथील मोहम्मद जावेद या एक्स युझरने ही पोस्ट शेअर केली आहे. मोहम्मद यांनी त्यांच्या लाडक्या मुलीसाठी तिचे आवडते पारले बिस्कीट खरेदी केली आणि ती मुलगी बिस्कीट खात असतानाचा एक फोटो आणि व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.

“फारकाळ वाट पाहिल्यानंतर राविफला तिचे आवडते बिस्किट आज मिळाले आहेत. पूर्वी १.५ युरोंना मिळाणारे बिस्कीट आता २४ युरोंना मिळतेय. राविफला हे फार आवडतात,” असे मोहम्मद यांनी या पोस्ट म्हटले आहे. २४ युरो म्हणजे जवळपास २,३४२ भारतीय रुपये एवढी किंमत होते. भारतात पारले बिस्कीटचे एक पाकिट केवळ पाच रुपयांना मिळते. दरम्यान, मोहम्मद यांनी दिलेली किंमत एका पारले पुड्याची आहे की संपूर्ण पाकिटाची याबाबत स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही.

मोहम्मद यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. नेटकऱ्यांनी या पोस्टवर चिंता व्यक्त करताना गाझा पट्टीतील अन्न टंचाईवर देखील भाष्य केले. काही नेटकऱ्यांनी बापलेकीच्या नात्याबाबत देखील कमेंट केली आहे. दैनंदिन आयुष्याशी लढा देत असलेल्या तुमच्या सारख्या लोकांना खूप प्रेम आणि ताकद, अशी प्रतिक्रिया एका एक्स युझरने दिली आहे.

एका नेटकऱ्यांने मात्र भारतीय लोकांशी कनेक्ट होण्यासाठी आणि भावनिक समर्थन मिळविण्यासाठी त्यांनी पारले जी निवडले. नाहीतर जगात अनेक बिस्कीटचे ब्रॅन्ड उपलब्ध आहेत, अशी दुसऱ्या एका युझरने पोस्ट केली आहे. अनेकांनी त्यांना गाझा येथे पारले बिस्किट पाठविण्याची इच्छा व्यक्त केली. मोहम्मद यांची ही पोस्ट सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत असून, चर्चेचा विषय ठरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT