Goa Cabinet: मायकल लोबो यांचे मंत्रिपद निश्चित? मध्यरात्री गाठली दिल्ली, राजकीय वर्तुळात खळबळ

Goa Cabinet Reshuffle: कळंगुटचे भाजप आमदार मायकल लोबो यांनी मध्यरात्री दिल्लीत तातडीचा दौरा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Goa Politics
MLA Michael Lobo Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा मंत्रिमंडळाचा फेरबदल गेल्या अनेक दिवसांपासून रखडला आहे. कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्या हकालपट्टीसह फेरबदलाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

नुकतेच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी गोव्यात प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची भेट घेतल्यानंतर गोवा मंत्रिमंडळातील फेरबदल निश्चित मानला जात आहे.

मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग आला असतानाच कळंगुटचे भाजप आमदार मायकल लोबो यांनी मध्यरात्री दिल्लीत तातडीचा दौरा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोबो यांचे मंत्रिपद निश्चित झाले असून, त्यासाठीच ते दिल्लीला रवाना झाले आहेत.

Goa Politics
Goa Court Judgement: मागे बसलेल्या तरुणीचा अपघाती मृत्यू, कोर्टाने बाईक राईडरला ठरवले दोषी; काय दिली शिक्षा?

गुरुवारी (०५ जून) रात्रीच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष गोव्यात दाखल झाले होते. कारवार दौऱ्यापूर्वी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी बंद दाराआड महत्त्वपूर्ण चर्चा केली. याच दरम्यान लोबो यांचा दिल्लीकडे तातडीने प्रवास सुरू झाल्याचे पाहायला मिळाले.

सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीतील काही वरिष्ठ नेत्यांकडून लोबो यांना बोलावणे आले होते. या दौऱ्यात ते दिल्लीतील ओळखीच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असून, सोमवारी ते गोव्यात परतणार आहेत. पक्षातील विश्वासू नेते म्हणून ओळखले जाणारे लोबो यांनी यापूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये आठ आमदारांचा गट आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Goa Politics
Haridwar Crime: माय-लेकीच्या नात्याला काळिमा! आईनेच पोटच्या लेकीला ढकलले नराधमांच्या जबड्यात, बॉयफ्रेंडला करायला लावला अत्याचार

नव्याने हालचाली सुरू

लोबो यांच्या जवळच्या वर्तुळातील व्यक्तींच्या म्हणण्यानुसार, पक्षश्रेष्ठींनी मंत्रिपदाबाबत दिलेले आश्वासन पूर्ण होत असून त्याबद्दल आभार मानण्यासाठीच लोबो दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलाची शक्यता अधिकच बळकट झाली आहे. लोबो यांच्या या दौऱ्यानंतर राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता असून, मंत्रिपदाच्या संभाव्य उमेदवारांमध्ये नव्याने हालचाली सुरू झाल्याचेही सूत्रांकडून समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com