Yuzvendra Chahal-Dhanashree Verma Divorce: टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची कोरिओग्राफर पत्नी धनश्री वर्मा सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात कटुता आल्याच्या बातम्या येत आहेत. या जोडप्याने 22 डिसेंबर 2020 रोजी मोठ्या थाटामाटात लग्न केले होते. मात्र आता ते विभक्त होत असल्याचे मीडिया रिपोर्ट्समधून संगितले जात आहे. त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांनी जोर धरला आहे.
दरम्यान, चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या अफवा सोशल मीडियावर बऱ्याच दिवसांपासून पसरत आहेत. आता, ETimes ने दिलेल्या वृत्तानुसार, जोडप्याच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याच्या विभक्त होण्याच्या अफवा खऱ्या आहेत. घटस्फोटाची पुष्टी झाली असून काही दिवसात ते यासंबंधी अधिकृत घोषणा करतील. मात्र, घटस्फोटाची (Divorce) प्रक्रिया अद्याप ठरलेली नाही. त्यांच्या विभक्त होण्यामागील कारणही अद्याप समोर आलेले नाही, परंतु हे निश्चित आहे की, त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
झलक दिख ला जा 11 च्या एपिसोडमध्ये धनश्रीने चहलसोबतची तिची प्रेमकहाणी सांगितली होती. लॉकडाऊनच्या काळात चहलने डान्स शिकण्यासाठी तिच्याशी कसा संपर्क साधला होता हे तिने सांगितले होते. त्यानंतर धनश्रीने त्याला डान्स शिकवण्यास होकार दिला होता. तिथून ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
2023 मध्ये चहलने त्याच्या IG वर एक स्टोरी शेअर केली होती, ज्यामध्ये त्याने लिहिले होते की, लाईफमध्ये काहीतरी नवीन घडत आहे. त्याच्या या पोस्टनंतर धनश्रीने इन्स्टाग्रामवरुन 'चहल' हे सरनेम हटवले होते. आता ती फक्त धनश्री वर्मा असे लिहिते. यानंतरच त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांनी जोर धरला होता. मात्र, चहलने घटस्फोटाच्या या बातम्यांना अफवा असल्याचे म्हटले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.