Indian Super League: विक्रमचा गोल अन् सामनाच झटक्यात फिरला! मुंबई मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबवर पडली भारी; नोंदवला शानदार विजय

Mumbai City FC beat Mohammedan Sporting Club: मुंबई सिटी एफसीने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत रविवारी दहा खेळाडूंसह खेळणाऱ्या मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबवर १-० फरकाने मात केली.
Indian Super League
FC Goa beat Punjab FCDainik Gomantak
Published on
Updated on

कोलकता: विक्रम प्रताप सिंग याने सामन्याच्या ४९व्या मिनिटास केलेल्या गोलच्या जोरावर मुंबई सिटी एफसीने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत रविवारी दहा खेळाडूंसह खेळणाऱ्या मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबवर १-० फरकाने मात केली. सामना येथील किशोर भारती क्रीडांगणावर झाला.

मुंबई सिटीचा हा ११ सामन्यांतील चौथा विजय होता. त्यांचे आता १७ गुण झाले असून ते सातव्या क्रमांकावर आहेत. मोहम्मेडन स्पोर्टिंगला आठवा पराभव पत्करावा लागला. ११ लढतीतून त्यांचे फक्त पाच गुण झाले असून ते शेवटच्या १३ व्या स्थानी आहेत.

सलग सहा सामन्यांत मोहम्मेडन स्पोर्टिंगला घरच्या मैदानावर विजय नोंदविण्यास अपयश आले आहे. यंदा स्पर्धेत त्यांनी कोलकत्यात (Kolkata) पाच पराभव पत्करले असून एका लढत बरोबरीत राहिली आहे. कोलकत्यात खेळलेल्या दहा आयएसएल सामन्यांत मुंबई सिटीने वर्चस्व राखताना सात विजय व दोन बरोबरी अशी कामगिरी साधली आहे.

Indian Super League
Indian Super League: एफसी गोवाची मार्केझना विजयी ‘भेट’; हैदराबाद एफसीची दाणादाण उडवत नोंदवला सलग चौथा विजय!

या सामन्यात मोहम्मेडन स्पोर्टिंगला तब्बल ५५ मिनिटे दहा खेळाडूंसह खेळावे लागले. त्यांच्या महंमद इर्षाद याला याला पूर्वार्धात तीन मिनिटांत दोन वेळा यलो कार्ड मिळाल्यामुळे रेड कार्डसह मैदान सोडावे लागले. इर्षादला अगोदर ३२व्या आणि नंतर ३५व्या मिनिटास यलो कार्ड दाखविण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com