Indian Super League: एफसी गोवा आणि ओडिशा एफसी यांच्यात रंगणार धूमशान; कलिंगा स्टेडियमवर कोणाचा दिसणार जलवा?

ISL 2025 FC Goa vs Odisha FC: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सध्या एफसी गोवा सात, तर ओडिशा एफसी सहा सामने अपराजित आहे.
Indian Super League: एफसी गोवा आणि ओडिशा एफसी यांच्यात रंगणार धूमशान; कलिंगा स्टेडियमवर कोणाचा दिसणार जलवा?
ISL 2024-25Canva
Published on
Updated on

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सध्या एफसी गोवा सात, तर ओडिशा एफसी सहा सामने अपराजित आहे. शनिवारी (ता. ४) भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर त्यांच्यात लढत होत असून पराभव टाळण्यासाठीच दोन्ही संघांत चढाओढ असेल.

मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवा संघाने अखेरच्या लढतीत २० डिसेंबर रोजी मोहन बागानला २-१ फरकाने नमविले होते. १९ ऑक्टोबर रोजी मुंबई सिटीविरुद्ध पराभूत झाल्यानंतर त्यांनी स्पर्धेत हार पत्करलेली नाही. दुसरीकडे सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील ओडिशा एफसीने मागील सहा सामन्यांत पराभव पत्करलेला नाही.

Indian Super League: एफसी गोवा आणि ओडिशा एफसी यांच्यात रंगणार धूमशान; कलिंगा स्टेडियमवर कोणाचा दिसणार जलवा?
Indian Super League: विक्रमचा गोल अन् सामनाच झटक्यात फिरला! मुंबई मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबवर पडली भारी; नोंदवला शानदार विजय

एफसी गोवाने (FC Goa) १२ सामन्यांतून सहा विजय, चार बरोबरी व दोन पराभवांसह २२ गुण प्राप्त केले आहेत. आणखी एक विजय नोंदविल्यास त्यांची गुणतक्त्यातील प्रगती निश्चित आहे. ओडिशा एफसीला मागील लढतीत तळाच्या मोहम्मेडन स्पोर्टिंगने गोलशून्य बरोबरीत रोखले होते. त्यांच्या खाती २० गुण आहेत. त्यांनी १३ लढतीत पाच विजय, पाच बरोबरी व तीन पराभव अशी कामगिरी साधलेली आहे.

विजयासाठीच प्रयत्न ः मार्केझ

भुवनेश्वरला रवाना होण्यापूर्वी मानोलो मार्केझ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की ``दोन्ही संघ सध्या अपराजित आहेत. बरोबरी झाल्यास ही मालिका पुढे सरकेल. विजयासाठीच प्रयत्न असतील, पण हा निकाल सोपा नसेल. सामन्यात काहीही होऊ शकते. ओडिशा घरच्या मैदानावर ताकदवान ठरतो. त्याचवेळी आमच्या संघापाशीही गुणांसाठी आव्हान देण्याची पूर्ण क्षमता आहे.``

Indian Super League: एफसी गोवा आणि ओडिशा एफसी यांच्यात रंगणार धूमशान; कलिंगा स्टेडियमवर कोणाचा दिसणार जलवा?
Indian Super League: एफसी गोवाची मार्केझना विजयी ‘भेट’; हैदराबाद एफसीची दाणादाण उडवत नोंदवला सलग चौथा विजय!

मैदानात उतरण्यापूर्वी...

एफसी गोवा सलग ७ लढतीत अपराजित, ५ विजय व २ बरोबरी

ओडिशा एफसीचे मागील ६ लढतीत ३ विजय व ३ बरोबरी

२०२४-२५ मोसमातील अवे मैदानावरील ६ सामन्यांत एफसी गोवाचे ३ विजय व ३ बरोबरी

२०२३-२४ मोसमात फातोर्डा येथे एफसी गोवाची ओडिशावर ३-२ फरकाने मात, भुवनेश्वर येथे १-१ गोलबरोबरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com