Women World Cup 2025 Dainik Gomantak
देश

Women's World Cup 2025: कोणाला मिळणार फायनलचे तिकीट? 'या' 4 संघांमध्ये रणसंग्राम, उपांत्य फेरीचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर!

Women World Cup: ३० ऑक्टोबर रोजी महिला विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत भारतीय संघाचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाशी होईल.

Sameer Amunekar

२०२५ महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली असून उपांत्य फेरीतील चारही संघ निश्चित झाले आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या संघांनी उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये भारतीय संघाची कामगिरी संमिश्र राहिली असून तीन विजय आणि तीन पराभव त्यांनी नोंदवले आहेत. स्मृती मानधना, प्रतीका रावल आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी फलंदाजीत चमक दाखवली आहे, तर गोलंदाजांनी देखील प्रभावी कामगिरी केली आहे.

उपांत्य फेरीचे वेळापत्रक

  • इंग्लंड महिला संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघ – २९ ऑक्टोबर, बरसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी

  • ऑस्ट्रेलिया महिला संघ विरुद्ध भारतीय महिला संघ – ३० ऑक्टोबर, डीवाय पाटील क्रिकेट स्टेडियम, नवी मुंबई

दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी ३:०० वाजता सुरू होतील, तर नाणेफेक अर्धा तास आधी होईल. उपांत्य सामन्यांतील विजेते संघ २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत आमनेसामने येतील.

भारतीय महिला संघाचा प्रवास

भारतीय महिला संघाने यापूर्वी दोनदा विश्वचषक अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, मात्र दोन्ही वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

२००५ मध्ये, ऑस्ट्रेलियाकडून ९८ धावांनी पराभव. २०१७ मध्ये, इंग्लंडकडून ९ धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. दोन्ही अंतिम सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व मिताली राजने केले होते.

सध्याची स्थिती

२०२५ च्या विश्वचषकात भारतीय संघाने आतापर्यंत सहा सामने खेळले, त्यापैकी तीन जिंकले आणि तीन गमावले आहेत. त्यांचा नेट रन रेट +०.६२८ असून ते पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहेत.

संघाचा शेवटचा लीग सामना २६ ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे, ज्यातून संघ अंतिम फेरीपूर्वी आपली गती कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामना क्रिकेटप्रेमींसाठी रोमांचक ठरणार असून, भारतीय महिला संघाच्या ऐतिहासिक विजयानंतरच्या स्वप्नांना पंख मिळतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Salman Khan Terrorist: बॉलिवूडचा 'टायगर' पाकिस्तानसाठी 'दहशतवादी', भाईजानच्या बलुचिस्तान विधानावरून पाकड्यांना झोंबली मिर्ची

Viral Video: टीव्हीला हेल्मेट बनवणाऱ्या पठ्ठ्याचा 'देसी जुगाड', सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'याला भारतरत्न द्या'

Jogamma Jogappa History: कार्तवीर्य अर्जुनाने जमदग्नीचा वध केल्याने रेणुका विधवा झाली; जोगम्मा आणि जोगप्पाची कथा

"शाहबाज शरीफ आणि आसिफ मुनीर महान लोक...''; दहशतवाद पसरवणाऱ्यांना ट्रम्प यांच्याकडून 'ग्रेट पीपल'चा दर्जा, आसियान परिषदेत उधळली स्तुतीसुमने

Upcoming Phones: Realme, OnePlus... 'या' आठवड्यात लॉन्च होणार 'हे' जबरदस्त स्मार्टफोन; फीचर्स एकदा पाहाच…

SCROLL FOR NEXT