

पणजी: येत्या डिसेंबर महिन्यात होणाऱ्या जिल्हा पंचायतींच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायत मतदारसंघ आणि त्यात येणाऱ्या गावांची व प्रभागांची संख्या अधिसूचित केली आहे. मात्र, आयोगाने या मतदारसंघाचे आरक्षण मात्र नंतर जाहीर केले जाईल, असेही म्हटले आहे.
दोन्ही जिल्हा पंचायतींच्या प्रत्येकी २५-२५ जागांसाठी डिसेंबरमध्ये निवडणूक होणार आहे. पक्षीय पातळीवर ही निवडणूक होणार असल्याने त्याकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागून आहे. राज्य निवडणूक आयोगाने दोन्ही जिल्हा पंचायतीतील मतदारसंघ आणि त्यात समाविष्ट झालेल्या गावांची जाहीर केलेली नावे खालीलप्रमाणे आहेत.
उत्तर गोवा जिल्हा पंचायत मतदारसंघांची नावे व त्यातील गावे ः हरमल ः हरमल, कोरगाव, केरी-तेरेखोल आणि पालये. मोरजी ः मोरजी, मांद्रे आणि आगरवाडा-चोपडे, धारगळ ः धारगळ विर्नोडा, कासणे-आंब्रे-पोरस्कडे, पार्से आणि तुये. तोरसे ः तोरसे, वारखंड-नागझर, इब्रामपूर-हणखणे, चांदेल-हसापूर, तांबोशे-मोपा-उगवे, ओझरी, हळर्ण आणि कासारवर्णे,
शिवोली ः शिवोली-सडये, शिवोली-मार्णा, कामुर्ली आणि ओशेल. कोलवाळ ः कोलवाळ, अस्नोडा, रेवोडा, पीर्ण आणि नादोडा. हळदोणे ः हळदोणे, पोंबुर्फा-ओलावली, बेस्तोडा आणि उक्सई-पाळे-पुनवला, सिरसई ः सिरसई, थिवी, मयडे आणि नास्नोळा, हणजूण ः हणजूण-कायसूव, वेर्ला-काणका आणि आसगाव. कळंगुट- कळंगुट, कांदोळी आणि हडपडे-नागोवा, सुकूर ः सुकूर, साळगाव, पर्रा आणि गिरी, रेईश मागूस ः रेईश-मागूस, पीळर्ण-मार्रा, नेरूल आणि सांगोल्डा. पेन्ह दी फ्रान्स ः पेन्ह दी फ्रान्स आणि साल्वादोर दो मुंद.
सांताक्रूझ ः सांताक्रूझ, कुडका-बांबोळी-तळावली, शिरोडा-पाले आणि बाती. ताळगाव ः ताळगाव, चिंबल ः चिंबल आणि मेरशी, खोर्ली ः खोर्ली, कुंभारजुवे, सांत इस्तेव, जुने गोवा, गोलती-नावेली आणि साव मातियास.
सेंट लॉरेन्स ः सेंट लॉरेन्स (आगसी), करमळी, सांत आंद्रे (गोवा वेल्हा), आजोशी-मुंडूर आणि नेवरा. लाटंबार्से ः लाटंबार्से, मुळगाव, मेणकुरे-धुमासे आणि अडवलपाल, कारापूर-सरवण ः कारापूर-सरवण, म्हावळिंगे-कुडचरी, कुडणे आणि पीळगाव, मये ः मये-वायंगिणी, चोडण-माडेल, शिरगाव आणि नार्वे, पाळे ः पाळे-कोठंबी, सूर्ला, आमोणा, नावेली आणि वेळगे, होंडा ः होंडा, पर्ये, पिसुर्ले आणि हरवळे. केरी ः केरी, डोंगुर्ली-ठाणे, म्हावशी आणि मोर्ले. नगरगाव ः नगरगाव, कोटोरे, भिरोंडा, सावर्डे आणि गुळेली.
दक्षिण गोवा जिल्हा पंचायत मतदारसंघांची नावे व त्यातील गावे ः उसगाव-गांजे ः उसगाव-गांजे, बेतकी-खांडोळा ः बेतकी-खांडोळा, तिवरे-ओरगाव, भोमा-हडकोळणा, वाळपई आणि केरी, कुर्टी ः कुर्टी-खांडेपार आणि वेरे-वाघुरे, वेळगे-प्रियोळ ः वेळगे-प्रियोळ-कुंकळ्ळी, मडकई आणि कुंडई, कवळे ः कवळे, बांदोडा, दुर्भाट आणि वाडी-तळावली, बोरी- बोरी आणि बेतोडा-निरंकाल-कोनशे-कोडार,
शिरोडा ः शिरोडा आणि पंचवाडी, राया ः राया, राशोल, लोटली आणि कामुर्ली, नुवे ः नुवे, वेर्णा आणि नागोवा, कोलवा ः कोलवा, माजोर्डा-उतोर्डा-कोलता, बेताळभाटी आणि सेरावली. वेळ्ळी ः वेळ्ळी, चिंखली-देवसाव, आंबेळी आणि आसोळणा. बाणावली ः काना-बाणावली, वार्का, कार्मोणा, कवळशे आणि ओर्ली.
दवर्ली ः रुमडामळ-दवर्ली, दवर्ली-दिकरपाल आणि आके-बायस, गवंडळी ः गवंडळी, बाळ्ळी-आदने, पारोडा, चांदोर-कार्वे आणि अंबावली, कुडतरी ः कुडतरी, साव जुझे दी आरीयल आणि माकाझन.
नावेली ः नावेली, तळावली, धर्मापूर-दाबाळ, सारझोरा. सावर्डे ः किर्लपाल-दाबाळ, सावर्डे आणि काले, धारबांदोडा ः कुळे, धारबांदोडा, मोले आणि साकोर्डे, रिवण ः रिवण, उगवे, नेत्रावळी, कुर्डी-वाडे आणि भाटी. शेल्डे ः शेल्डे, असोल्डा, अवेडे-कोठांबी. बार्से ः बार्से-कुडे, कार्वे-पीर्ला, मळकर्णे, मोरपीर्ला आणि फातोर्डा-किटला, खोला ः खोला, श्रीस्थळ, आगोंदा आणि नाकेरी-बेतुल. पैंगीण ः पैंगीण, लोटली-पोळे, गावडोंगरी आणि खोतीगाव. सांकवाळ ः सांकवाळ आणि चिखली, कुठ्ठाळी ः कुठ्ठाळी, केळोशी, कासावली-आरोशी, वेळगाव-पाले आणि चिकोळणा-बागमोळो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.