Couple Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh: PM हाऊसिंगचा पहिला हप्ता येताच चार बायका प्रियकरासोबत पळाल्या, वाचा संपूर्ण प्रकरण

प्रत्यक्षात प्रधानमंत्री नागरी गृहनिर्माण योजनेचा पहिला हप्ता महिला लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचला तेव्हा चार महिला पैसे घेऊन प्रियकरासोबत पळून गेल्या.

Manish Jadhav

Uttar Pradesh: उत्तरप्रदेशातील बाराबंकीमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जिथे एक नाही, दोन नव्हे तर चार महिलांनी त्यांच्या प्रेमप्रकरणामुळे पतीला अडचणीत आणले आहे. प्रत्यक्षात प्रधानमंत्री नागरी गृहनिर्माण योजनेचा पहिला हप्ता महिला लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचला, तेव्हा चार महिला पैसे घेऊन प्रियकरासोबत पळून गेल्या.

दरम्यान, हप्ता दिल्यानंतर बांधकाम सुरु न केल्याने संबंधित विभागाने नोटीस बजावली. त्यांच्या पतींनी हा खुलासा केला. दुसरीकडे, दोन महिला लाभार्थ्यांच्या पतींनी संबंधित विभागाकडे अर्ज करुन हप्ता बंद करण्याची मागणी केली. त्यातील एकजण म्हणाला की, साहेब आता हप्ता पाठवू नका, पहिल्या हप्त्याचे पैसे घेऊन माझी पत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आहे.

दुसरीकडे, पतीच्या तक्रारीवरुन घराचा हप्ता थांबवण्यात आला. फतेहपूर नगर पंचायतीच्या दोन महिला प्रधानमंत्री नागरी गृहनिर्माण योजनेच्या लाभार्थी होत्या. त्यांना पहिला हप्ता मिळणार होता. या दोन्ही महिला (Women) लाभार्थी महिनाभरापूर्वी पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेल्या.

त्यानंतर, त्यांच्या पतींनी पीओ डूडा कार्यालयात अर्ज करुन घराचा हप्ता न पाठवण्याची विनंतरी केली. अर्ज प्राप्त झाल्यानंतर विभागाने चौकशी करुन तक्रार योग्य असल्याचे म्हटले. आता दोन्ही लाभार्थ्यांचे पैसे थांबवण्यात आले आहेत.

तसेच, प्रधानमंत्री नागरी आवास योजना ही शहरी भागातील बेघर लोकांसाठी पक्की घरे बांधण्याची योजना आहे. नगर पंचायत बेल्हारा, बांकी, जैदपूर आणि सिद्धौरमधील या चार महिला लाभार्थ्यांच्या खात्यात घरकुलाचा पहिला हप्ता पाठवण्यात आला. या लाभार्थ्यांच्या घरबांधणीचे काम सुरु न झाल्याने पो.कॉ. डूडा सौरभ त्रिपाठी यांनी नोटीस पाठवून तातडीने बांधकाम सुरु करण्याचे आदेश दिले होते.

मात्र, नोटीस देऊनही बांधकाम सुरु झाले नाही. वसुलीसाठी पुन्हा नोटीस बजावली असता चार महिलांचे पती कार्यालयात पोहोचले आणि सांगितले की, 'साहेब, माझी पत्नी तिच्या प्रियकरासोबत पहिल्या हप्त्याचे 50 हजार रुपये घेऊन पळून गेली, त्यामुळे दुसरा हप्ता तात्काळ थांबवावा.' आता या लाभार्थ्यांकडून वसुली कशी करायची, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे.

40 लाभार्थ्यांकडून 20 लाख वसूल केले जातील

पंतप्रधान नागरी गृहनिर्माण योजनेंतर्गत आतापर्यंत 4063 लाभार्थ्यांच्या खात्यावर घरबांधणीचा पहिला हप्ता पाठविण्यात आला आहे. यापैकी 40 लाभार्थी असे आहेत की, ज्यांनी खात्यातून पैसे काढले असून त्यांनी बांधकाम सुरु केले नाही.

या लाभार्थ्यांना दोन वेळा नोटिसा बजावल्यानंतर आता काम सुरु न झाल्यास त्यांच्याविरुद्ध आरसी देण्याची तयारी विभागाने केली आहे. सर्व लाभार्थ्यांकडून 20 लाख रुपये वसूल करावे लागतील. सर्वांकडून वसुली झाल्यानंतर त्यांना ब्लॅक यादीत टाकण्यात येईल, असे पो.डूडा यांनी सांगितले. दुसरीकडे, त्यांना पुन्हा असा अर्ज करता येणार नाही.

पीओ डूडा सौरभ त्रिपाठी सांगतात की, घराचा हप्ता मिळाल्यानंतर चार महिला लाभार्थी पती सोडून प्रियकरासोबत पळून गेल्या आहेत. नोटीस बजावल्यानंतर त्यांच्या पतींनी ही माहिती दिली. फतेहपूरहून दोन प्रार्थनापत्रे मिळाली की, त्यांच्या बायका इतरांसोबत पळून गेल्या आहेत, त्यामुळे त्यांचे हप्ते बंद करण्यात यावेत. सर्वांकडून वसुली करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Military Dog Tyson: लष्कराचा श्वान ‘टायसन’ला शौर्यसन्मान, गोळी झाडल्यानंतरही दहशतवाद्यांवर केला होता हल्ला

अमेरिकेत 'इंडिया डे'चा धमाका! 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यू यॉर्कची 'अँपायर स्टेट बिल्डींग' झाली तिरंगामयी; तारक मेहताच्या कलाकारांची खास उपस्थिती

Goa Crocodile Video: गोव्यात घरात घुसली भलीमोठी मगर; कुटुंबाची उडाली तारांबळ, वन विभागाकडून मगरीची सुरक्षित सुटका

PM Modi Mental Naxalism Statement: मोदींच्या ‘बौद्धिक नक्षली’ उल्लेखावरून रणकंदन; विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Upasnagar Sankval Junction: भुयारी मार्ग नाही तर रस्त्यावर उतरू! उपासनगर-सांकवाळ ग्रामस्थांचा इशारा; चौक ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’

SCROLL FOR NEXT