Uttar Pradesh: दारू पिण्यास मनाई केली, गरोदर पत्नीला त्याने दुचाकीला बांधून 200 मीटर फरफटत नेले

विशेष म्हणजे या महिलेचा आणि रामगोपाल यांचा प्रेमविवाह झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Uttar Pradesh Crime News
Uttar Pradesh Crime NewsDainik Gomantak

उत्तर प्रदेशातील पिलीभीतमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गर्भवती महिलेने तिच्या पतीला दारू पिण्यास विरोध केल्याने, पतीने तिला दुचाकीला दोरीने बांधून सुमारे 200 मीटरपर्यंत फरफटत नेले.

या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून, राम गोपाल असे त्याचे नाव आहे. उत्तर प्रदेश राज्यातील घुंगचाई गावातील ही घटना आहे. (Uttar Pradesh Crime News)

Uttar Pradesh Crime News
Rajasthan: पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे येत होता अमली पदार्थ; जवानांनी दोघांना फिल्मी स्टाईलने केली अटक

याप्रकरणी महिलेने पोलिसांना तक्रार दिली आहे. महिलेला तिचा नवरा रोज दारूच्या नशेत तिच्याशी गैरवर्तन करतो. दरम्यान, शनिवारी त्याला दारू पिण्यास मनाई केली. याचा राग आल्याने त्याने तिला बेदम मारहाण केली.

आरोपी पती रामगोपाल महिलेला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर तिचे दोन्ही हात व पाय बांधण्यात आले. व दुचाकीला बांधून तिला 200 मीटरपर्यंत फरफटत नेले.

महिलेच्या भावाला घटनेची माहिती मिळताच त्याने तातडीने घटनास्थळी जाऊन महिलेला वाचवले.

Uttar Pradesh Crime News
Asaduddin Owaisi: 'इस्लामने भारताला दिली लोकशाहीची देणगी', MIM च्या ओवेसींचे वक्तव्य

महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे. आरोपी पती हा व्यवसायाने मजूर आहे.

विशेष म्हणजे या महिलेचा आणि रामगोपाल यांचा प्रेमविवाह झाल्याचे सांगण्यात येत आहे. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता दोघांनी लग्न केले होते.

रामगोपालची वागणूक खूप चांगली होती. पण, त्याला दारू पिण्याचे व्यसन कसे लागले. त्यानंतर तो दारू पिऊन घरी यायचा आणि त्याच्यात भांडणे व्हायची.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com