Uttar Pradesh: बाराबंकीतील मदरशावर फडकला पाकिस्तानी ध्वज, गुन्हा दाखल

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील एका मदरशावर 'इस्लामिक ध्वज' फडकवण्यात आला आहे.
Pakistani Flag
Pakistani FlagDainik Gomantak

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील एका मदरशावर 'इस्लामिक ध्वज' फडकवण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरु केला आहे. ही घटना सुबेहा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावातील आहे.

स्टेशन हाऊस ऑफिसर संजीव कुमार सोनकर म्हणाले की, "प्रजासत्ताक दिनी हुसेनाबाद गावातील मदरसा अशरफुल उलूम इमा इमदादिया सकीन येथे 'इस्लामिक ध्वज' फडकल्याची तक्रार आम्हाला मिळाली आहे."

आरोपी आसिफविरुद्ध गुन्हा दाखल

सोनकर म्हणाले की, “आम्ही झेंडा फडकवणाऱ्या आसिफविरुद्ध एफआयआर (FIR) नोंदवला आहे. आम्हाला सांगण्यात आले की, त्या मदरशाचे विद्यार्थी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी तिथे जमले होते."

Pakistani Flag
Uttar Pradesh: दारू पिण्यास मनाई केली, गरोदर पत्नीला त्याने दुचाकीला बांधून 200 मीटर फरफटत नेले

बिहारच्या पूर्णियामध्ये पाकिस्तानी ध्वज फडकवण्यात आला

त्याचबरोबर, बिहारच्या (Bihar) पूर्णियामध्येही पाकिस्तानचा ध्वज फडकवण्यात आला आहे. हे प्रकरण मधुबनी सिपाही टोला भागातील आहे. यासंदर्भात आता एसएचओ पवन चौधरी यांचे वक्तव्य समोर आले आहे. ते म्हणाले की, 'ध्वज उतरवण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास सुरु आहे.'

मिळालेल्या माहितीनुसार, मशिदीला लागून असलेल्या घराच्या छतावर हा ध्वज फडकवण्यात आला होता. त्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून तो हटवला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com