Uttar Pradesh: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा भाजप नेत्यावर आरोप

पीडिते मुलीने पत्रकार परिषदेत स्वत: सांगितली आपली व्यथा
Crime News
Crime News Dainik Gomantak

उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये (Uttar Pradesh, Bahraich) एका भाजप नेत्यावर (BJP Leader) अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. 18 ऑगस्ट रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत पीडितेने बहराइच लोकसभा खासदार अक्षयवर लाल गोंड यांच्या निवासस्थानी जाऊन तिची व्यथा सांगितली तेव्हा हे संपूर्ण प्रकरण समोर आले. बहराइच भाजपचे शहर उपाध्यक्ष व त्यांच्या एका नातेवाईकाने तिच्यावर बलात्कार केला असल्याचे पीडितेने यावेळी सांगितले.

अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची कहाणी जुनी आहे. या वर्षी जून महिन्यात गावातीलच एका तरुणाने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर बलात्कार केला होता. त्या बलात्कार प्रकरणातील आरोपी पॉक्सो कायद्यान्वये तुरुंगात आहे. आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्या चुलत भावाने मोठा कट रचला. त्याने पीडितेला पुन्हा एका तरूणाच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. हा तरूण भाजपच्या शहर उपाध्यक्षासोबत काम करत होता. पीडितेच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळताच त्यांनी तिला लखनऊ येथील तिच्या मावशीच्या घरी पाठवले.

Crime News
Vastu Tips For Money: कर्जातून मुक्तीसाठी वास्तुशास्त्राशी संबंधित हे उपाय नक्की करून पहा

दरम्यान, तरुणी भाजपच्या शहर उपाध्यक्षासोबत काम करणाऱ्या तिच्या नवीन प्रियकराच्या संपर्कात राहिली. त्याने मुलीवर कोर्टातील जबाब बदलण्यासाठी दबाव टाकला आणि तिला लखनौहून बहराइचला बोलावून आपल्या बॉसच्या ऑफिसमध्ये ठेवले. तेथे नशा करून भाजप नेता आणि त्याच्या आणखी एका साथीदाराने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचा चुलत भाऊ पवन पाल याने पीडितेला मदतीचे आश्वासन देऊन लखनऊहून बहराइचला बोलावून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याला भाजप नेत्याच्या वैयक्तिक कार्यालयात नेले, तेथेही त्याने तिच्याशी गैरवर्तन केले.

Crime News
Afghanistan:अफगाण पुरुषांसोबत स्त्रियांना बागेत 'नो एन्ट्री', तालिबानचे नवे फर्मान

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com