राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत Dainik Gomantak
देश

जिथे हिंदूंची लोकसंख्या कमी तिथे..: मोहन भागवत

लोकांचे लक्ष काही मुख्य मुद्द्यांवरुन दुसरीकडे वळवायचे आहे. के. सी. त्यागी (K. C. Tyagi)यांनी ज्या ठिकाणी आता मुस्लीम लोकसंख्या अधिक आहे. अश्या या लक्षद्वीप आणि काश्मीरमध्ये (Lakshadweep and Kashmir)सध्या कोणतीही समस्या नाही.

दैनिक गोमन्तक

अनेक कारणांमुळे ज्या ठिकाणी हिंदूंची (hindu)लोकसंख्या कमी झाली आहे तिथे अनेक समस्या निर्माण होत आहेत.असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS)सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे. या कारणास्तव संघ सर्वव्यापी होऊन जागतिक कल्याणाबाबत या विषयीची चर्चा करेल. असेही मोहन भागवत यांनी सांगितले आहे.

हिंदू राष्ट्राच्या वैभवामुळे जगाचं कल्याण होईल, असा विश्वास मोहन भागवतांनी (Mohan Bhagwat)व्यक्त केला आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये संघाच्या स्वयंसेवकांनी अहोरात्र केलेली निःस्वार्थ सेवा म्हणजेच हिंदूत्व आहे, असे भागवत यांनी हिंदूत्वाची व्याख्या सांगताना म्हटले आहे.

निःस्वार्थ कामांमध्ये लोकांच्या कल्याणाची भावना असते. हिंदूंची लोकसंख्या कमी होत असलेल्या भागात नव्याने समस्या निर्माण होत आहेत. असे भागवत यांच्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात झाली आहे. मोहन भागवत यांनी राजस्थानमध्ये (Rajasthan) उदयपुरमधील (Udaipur)विद्या निकेतन सेक्टर 4 मध्ये आयोजित एका कार्यक्रमाच्यावेळी संघाचे संस्थापक डॉ. हेगडेवार(Dr. Hegdewar) यांच्या विचारांबद्दल विधान केले.

हेगडेवार यांनी हिंदू सामाजाला एकत्र आणल्यास भारतातील सर्व समस्यांवर समाधान मिळवता येऊ शकेल असे म्हटल्याची आठवण मोहन भागवत यांनी केली होती. आपण सर्वजण एकाच भारतमातेची लेकरं आहोत. आणि हिंदू हे सनातन संस्कृतीला (Sanatan Sanskriti)मानणारे आहेत. सनातनाच्या विचारसणीमधील संस्कार हे संपूर्ण विश्वाचा विचार करा अशी शिकवण देतात. हिंदूंच्या विचारसरणीमध्ये दोन गोष्टींचा समावेश आहेत त्या म्हणजे शांती आणि सत्य. आपण हिंदू नाही अशी मोहीम देश आणि समाजाला कमकूवत बनवत आहेत या उद्देशाने सुरु आहे. अशी टीका ही भागवत यांनी केली.

संघाचे संस्थापक डॉ. हेगडेवार हे भारतामध्ये (India)विविधतेच्या एकतेचा भाव असल्याचे ओळखले होते, असेही भागवत यावेळी म्हणाले. पिढ्यांन पिढ्या पासून या पुण्यवान भागात राहणाऱ्या पूर्वजांचे आपण वंशज आहे. आपण सर्वजण हिंदू आहोत. आणि तोच हिंदुत्वाचा भाव आहे, असे सांगताना भागवत यांनी हेगडेवार यांच्या कारकिर्दीची माहिती दिली.

हेगडेवार यांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थाची आहुती दिली आहे. आणि ते भारतासाठी काम करीत आहेत आणि त्यांचा हा मार्ग स्वत:च्या इच्छेने निवडला आहे. देशाला स्वातंत्र्य (Country independence)मिळाल्यानंतर आपण पुन्हा इतरांवर अवलंबून राहू नये, आणि यावर काम करण्याची गरज आहे हे हेगडेवार यांनी अचूक ओळखले आहे. आणि यातूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उदय झाला.

तर दुसरीकडे, समाजवादी पक्षाचे अनेक नेते राकेश सिन्हा (Rakesh Sinha)यांनी संघ प्रमुख संघाची पारंपारिक विचारसणी विचारात घेत याबाबत वक्तव्य केल्याचे म्हटले आहे. भागवत यांना धार्मिक उन्माद निर्माण करायचा आहे. त्यांना लोकांचे लक्ष काही मुख्य मुद्द्यांवरुन दुसरीकडे वळवायचे आहे. के. सी. त्यागी यांनी ज्या ठिकाणी आता मुस्लीम लोकसंख्या अधिक आहे. अश्या या लक्षद्वीप आणि काश्मीरमध्ये सध्या कोणतीही समस्या नाही असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भुसावळ ते गोवा थेट रेल्वे सेवेची मागणी! मुंबईचा त्रास टळणार; हजारो कोकणवासीयांचा वेळ आणि पैसा वाचणार

Rohit Sharma Record: सचिन, कोहलीला जे जमलं नाही, ते रोहित ऑस्ट्रेलिया मालिकेत करणार! फक्त 'इतक्या' षटकारांची गरज, विश्वविक्रम रचणार

Goa Shipyard Blast: लोटली स्फोटातील मृतांची संख्या वाढली; शिपयार्ड सील, सुरक्षा अधिकाऱ्याला अटक!

Asim Munir: पाकचे सैन्य प्रमुख आसिम मुनीरने पुन्हा ओकली गरळ; भारताला दिली अणुयुद्धाची धमकी Watch Video

Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! एसी कोचमध्ये स्वच्छतेवर भर; प्रवाशांना मिळणार कव्हर घातलेले ब्लँकेट

SCROLL FOR NEXT