RSS भारतात तालिबान प्रमाणे वागते, जगदानंद सिंह यांचे वादग्रस्त विधान..

जगदानंद (Jagdanand Singh) यांच्या विधानानंतर भाजपाने यावर पलटवार करीत जो ज्या परिस्थितीमध्ये राहतो त्याप्रमाणे विचार करतो अशा शब्दांत टोला लगावला आहे.
जगदानंद सिंह यांचे वादग्रस्त विधान.
जगदानंद सिंह यांचे वादग्रस्त विधान.Dainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: आरएसएस (RSS) हे तालिबान (Taliban) प्रमाणे वागत असल्याचे वादग्रस्त विधान आरजेडीचे (RJD) प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह (Jagdanand Singh)यांनी केले आहे. बिहारमधील पक्षकार्यालयात ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. (RSS behaves like Taliban in India, Jagdanand Singh's controversial statement)

जगदानंद सिंह यांचे वादग्रस्त विधान.
मोदी 'तालिबान' हा शब्दही उच्चारत नाहीत: ओवेसींची जहरी टीका

सिंह म्हणाले, भारतात आरएसएस तालिबान प्रमाणे वागत असून, अफगाणिस्तानमध्ये तालिबानने जे केले, तेच काम भारतात आरएसएस करत आहे. त्यांच्या या वादग्रस्त विधानावरून राजकारण चंगलेच तापले असून, नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

जगदानंद सिंह यांचे वादग्रस्त विधान.
भारताने अफगाणिस्तानमधील राजनैतिक उपस्थिती कायम ठेवावी; तालिबान केली विनंती

ते म्हणाले, आरएसएस हे बांगड्या विकणाऱ्यांना, पंक्चर काढणाऱ्यांना मारहाण करतात. आरएसएस आणि तालिबान यांच्यामध्ये काहीच फरक नाही. तालिबान हे नाव नसून एक संस्कृती आहे जी अफगाणिस्तानमध्ये आहे. संघाचे लोक बांगड्या विकाणाऱ्यांना, पंक्चर काढणाऱ्यांना मारहाण करीत असतात. आरएसएसला आताच थांबविण्याची गरज आहे. त्यांच्याविरोधात आपण पुढे येणे गरजेचे आहे.

राष्ट्रीय जनता दलाने देखील आपल्या ट्विटरवरून याबाबत आपल्या नेत्याच्या वादग्रस्त विधानाचे समर्थन केले आहे. जगदानंद यांच्या विधानानंतर भाजपाने यावर पलटवार करीत जो ज्या परिस्थितीमध्ये राहतो त्याप्रमाणे विचार करतो अशा शब्दांत टोला लगावला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com