हिंदू - मुस्लिमांचा डीएनए एकच - Mohan Bhagwat

आम्ही गेल्या 40,000 वर्षांपासून एकाच पूर्वजांचे वंशज आहोत. भारतातील लोकांचा डीएनए एकसारखाच आहे.
Hindus - Muslims have the same DNA - Mohan Bhagwat
Hindus - Muslims have the same DNA - Mohan BhagwatDainik Gomantak

आरएसएस(RSS) प्रमुख मोहन भागवत(Mohan Bhagwat) यांनी सर्व भारतीयांचे(Indians) डीएनए समान आहेत तसेच हिंदू-मुस्लिम(Hindu-Muslim) ऐक्य दिशाभूल करीत आहे कारण ते वेगळे नसून एक आहेत असे विधान केले आहे. मुस्लिम राष्ट्रीय मंच आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले असून लोक ज्या प्रकारे उपासना करतात त्या आधारावर त्यांचा भेदभाव केला जाऊ शकत नाही.असेही मोहन भागवत यांनी म्हण्टलं आहे.

लिंचिंगबाबत ते म्हणाले की यात सामील झालेले लोक हिंदुत्वाच्या विरोधात आहेत आणि लोकशाहीमध्ये हिंदू किंवा मुस्लिम यांचे वर्चस्व असूच शकत नाही.

Hindus - Muslims have the same DNA - Mohan Bhagwat
Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा संसदेबाहेर एल्गार

संघाचे प्रमुख भागवत पुढे म्हणाले, हिंदू-मुस्लिम ऐक्य दिशाभूल करणारे आहे कारण ते वेगळे नसून एक आहेत. उपासनेच्या मार्गाविषयी लोकांमध्ये भेद असू शकत नाही. राजकारण करू शकत नाही अशा काही गोष्टी आहेत. राजकारण लोकांना एकत्र करू शकत नाही. राजकारण लोकांना एकत्र करण्याचे साधन बनू शकत नाही.

त्याचबरोबर हे सिद्ध झाले आहे की आम्ही गेल्या 40,000 वर्षांपासून एकाच पूर्वजांचे वंशज आहोत. भारतातील लोकांचा डीएनए एकसारखाच आहे. हिंदू आणि मुस्लिम हे दोन गट नाहीत, एकत्र होण्यासाठी काही नाही, ते आधीच एकत्र असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच आम्ही लोकशाहीमध्ये राहत असून यावर हिंदू किंवा मुस्लिम यांचे वर्चस्व असू शकत नाही. केवळ भारतीयच वर्चस्व गाजवू शकतात. देशात ऐक्य झाल्याशिवाय विकास शक्य नाही. राष्ट्रवाद हा एकतेचा आधार झाला पाहिजे.असे आवाहनही मोहन भागवत यांनी यावेळी बोलताना केले आहे.

जर एखादा हिंदू असे म्हणतो की येथे कोणताही मुस्लिम राहू नये तर ती व्यक्ती हिंदू असूच शकत नाही. गाय हा एक पवित्र प्राणी आहे, परंतु जे इतरांना मारत आहेत ते हिंदुत्वाच्या विरोधात असून हे प्रकार चुकीचे असल्याचे मतही मोहन भागवत यांनी मांडले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com