देश

"तुम्ही काँग्रेसचे अध्यक्ष होणार का...?" राहुल गांधींनी स्पष्टच सांगितले

गोमन्तक डिजिटल टीम

काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोण होणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागून राहिले आहे. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक (Congress President Election) प्रक्रिया सध्या सुरू आहे. येत्या 19 ऑक्टोबरपर्यंत काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा कोणाकडे जाणार या प्रश्नाचं उत्तर मिळेल. काँग्रेस अध्यक्षपद घेण्यास राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी यापूर्वी देखील नकार दिला आहे. त्यामुळे, काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतील राहुल गांधी आहेत की नाही याबाबत काँग्रेसमध्येही संभ्रम आहे. दरम्यान, सध्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेवेळी (Bharat Jodo Yatra) त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला.

राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडलो नसल्याचे संकेत दिले आहेत. राहुल गांधी म्हणाले, "मी काँग्रेसचा अध्यक्षपद होणार की नाही हे निवडणूक झाल्यावर स्पष्ट होईल. मी निर्णय घेतला आहे, त्याबाबत मी स्पष्ट आहे. पक्षाची निवडणूक होईल त्यावेळी उत्तर देईन." यावेळी राहुल गांधी यांनी भाजपवर निशाना साधत भाजप विरोधी पक्ष संपविण्यासाठी काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

काँग्रेसला वाचवण्यासाठी यात्रा काढली जात असल्याच्या भाजपच्या आरोपावर बोलताना ते म्हणाले, "भाजप-आरएसएस यांना त्यांचे मत देण्याचा त्यांना अधिकार आहे. पण, आम्ही ही यात्रा जनतेशी जोडण्यासाठी करत आहोत. ही 'भारत जोडो यात्रा' समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ग्राउंड लेव्हलवर काय चालले आहे हे समजून घेणे आणि त्याच बरोबर भाजप-आरएसएसने केलेल्या नुकसानाची भरपाई करण्याचा प्रयत्न आहे." असे राहुल गांधी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Formula 4 Racing In Goa: गोव्यात होणार प्रतिष्ठीत 'फॉर्म्युला- 4 रेस'; गोमंतकीयांना अनुभवता येणार जागतिक रेसिंग स्पर्धेचा थरार

Goa Congress: 'भाजप का काँग्रेसविरोधात लढायचंय ठरवा'; भूमिका स्पष्ट करण्याचा माणिकराव ठाकरेंचा 'आप'ला सल्ला

Vaibhav Suryavanshi: LIVE सामन्यात वाद! आऊट दिल्यावर 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी अंपायरवर भडकला; पुढे काय झालं, पाहा VIDEO

Mohammed Siraj: "जा, रिक्षा चालव!", एका अपयशाने 'हिरो' ते 'झीरो'? मोहम्मद सिराजने नेटिझन्सच्या दुटप्पी भूमिकेवर सोडले मौन, म्हणाला...

दोघांमधील भांडण विकोपाला गेले, पत्नीने रागाच्या भरात पतीच्या अंगावर कढईतील उकळते तेल ओतले

SCROLL FOR NEXT