Jaya Bachchan in Rajyasabha 
देश

Video: "आम्ही काही शाळकरी मुले नाही..." संतपलेल्या जया बच्चन यांनी राज्यसभेच्या सभापतींना सुनावले

Jagdeep Dhankhar: "तुम्ही जे काही बोलता त्याचा देशात आदर केला जातो. मला खात्री आहे की तुमच्यासारख्या महान अभिनेत्यानेही अनेक रिटेक घेतले असतील."

Ashutosh Masgaunde

"We are not school children..." MP Jaya Bachchan hit back after Rajya Sabha Speaker Jagdeep Dhankhad's remarks on the Congress leaders:

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी सभागृहाच्या कामकाजादरम्यान एक प्रश्न वगळण्यावरून विरोधी सदस्यांनी केलेल्या गदारोळात काँग्रेस नेत्यावर केलेल्या टिप्पणीनंतर समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

हा मुद्दा समजावून सांगितला असता तरहे सदस्यांना समजले असते, 'आता आम्ही काही शाळकरी मुले नाही आहोत' असे त्या म्हणाल्या. सर्वच पक्षांच्या खासदारांना आदराने वागवले पाहिजे, असेही त्या पुढे म्हणाल्या.

खरं तर, मंगळवारी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विमान वाहतुकीवर प्रश्न वगळला असता, समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन, काँग्रेसचे दीपेंद्रसिंग हुड्डा आणि इतर विरोधी सदस्य उभे राहिले आणि त्यांनी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांना असे का केले, असा सवाल केला.

काही वेळाने परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत सभापतींनी प्रश्न क्रमांक 19 चे उत्तर पूर्ण झाल्यानंतर सोडलेला प्रश्न क्रमांक 18 घेण्यात येईल असे सूचित केले असल्याचे सांगितले.

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड म्हणाले, "हे संयमाने घेतले जाईल आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. जया बच्चन या खूप ज्येष्ठ सदस्य आहेत आणि त्यांच्या काही भावना असतील तर त्याबद्दल त्यांचे गंभीर असणे स्वाभाविक आहे."

जया बच्चन बोलायला उठल्या तेव्हा सभापतींनी त्यांना अडवलं आणि म्हणाले, "मला जया बच्चन जी यांना विनंती करायची आहे. तुम्ही खूप ज्येष्ठ सदस्य आहात. असो, तुम्ही जे काही बोलता त्याचा देशात आदर केला जातो. मला खात्री आहे की तुमच्यासारख्या महान अभिनेत्यानेही अनेक रिटेक घेतले असतील."

जया बच्चन म्हणाल्या, "तुम्ही किंवा उपसभापतींनी आम्हाला बसण्यास सांगितले तर आम्ही बसू, पण जेव्हा दुसरा सदस्य आमच्याकडे बोट दाखवून आम्हाला बसण्यास सांगेल, तेव्हा आम्ही ऐकणार नाही. प्रश्न विचारणे हा आमचा अधिकार आहे. तुम्ही आम्हाला सांगा की एखादा प्रश्न किंवा समस्या असेल तर ती नंतर घेतली जाईल, आम्ही समजू, पण आमच्याशी अनादर करायला आम्ही शाळकरी मुले नाही.

यावर सभापती धनखड म्हणाले, "ते बरोबर आहे. या भावनेशी कोणतेही दुमत असणार नाही, असे मला वाटते. सभागृह हे नियम आणि सभापती असलेल्या व्यक्तीच्या नियंत्रणाखाली असते आणि मला खात्री आहे की प्रत्येकजण त्याचे पालन करील. सर्व काही त्याद्वारेच झाले पाहिजे."

या गदारोळात राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांनी विरोधी सदस्यांना त्यांच्या जागेवर बसण्यास सांगितले होते. दीपेंद्र हुड्डा विरोध करत असताना जगदीप धनखड म्हणाले, "तुम्ही त्यांचे (जया बच्चन यांचे) प्रवक्ते नाही आहात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT