Kerala Court: अल्पवयीन बहिणींवर बलात्कार करणाऱ्या बापाला 123 वर्षांची शिक्षा, दोन वर्षांत 'न्याय'

Kerala Court: अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या निर्दयी पित्याला न्यायालयाने 123 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
Court
CourtDainik Gomantak

Kerala Court: अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या निर्दयी पित्याला न्यायालयाने 123 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच, सुमारे नऊ लाख रुपयांचा दंड ठोठावला. हे प्रकरण 2022 मधील आहे, जेव्हा अल्पवयीन बहिणींकडून पोलिसांकडे तक्रार आली होती की त्यांचे वडील एक वर्षापासून त्यांचे लैंगिक शोषण करत आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देश हादरला होता.

दरम्यान, केरळमधील मलप्पुरम शहरात आपल्या दोन मुलींवर अत्याचार करणाऱ्या निर्दयी पित्याला न्यायालयाने 123 वर्षांची शिक्षा सुनावली. मांजेरीच्या विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. ही घटना 2021 ते 2022 दरम्यान घडल्याचे सांगण्यात येत आहे. पीडित मुलींच्या म्हणण्यानुसार, त्यांचे वडील वर्षभरापासून त्यांच्यासोबत असे अभद्र कृत्य करत होते. घटनेच्या वेळी बहिणी 11 आणि 12 वर्षांच्या होत्या. बलात्कारप्रकरणी दोषी ठरलेल्या वडिलांना न्यायालयाने 8.85 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. न्यायालयाने या प्रकरणाची जलदगती पातळीवर सुनावणी करताना पुराव्यांच्या आधारे वडिलांना दोषी ठरवले आहे.

दुसरीकडे, ही काही पहिलीच वेळ नाही. डिसेंबर 2023 मध्ये, केरळमधील कासारगोड येथे दोन अल्पवयीन मुले आणि त्यांच्या अल्पवयीन बहिणीचे तीन वर्षांहून अधिक काळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर 25 वर्षीय व्यक्तीला 189 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com