Vice President Jagdeep Dhankhar: धनखड यांच्या मिमिक्रीवरुन भाजप आणि सरकार संतप्त, रील बनवणाऱ्या राहुल गांधींनाही घेरलं!

Parliament: गेल्या दोन दिवसांत संसदेत गदारोळ केल्याप्रकरणी 100 हून अधिक खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.
TMC MP
TMC MP Dainik Gomantak

Vice President Jagdeep Dhankhar: संसदेचे हिवाळी अधिवेशन गदारोळामुळे गाजत आहे. गेल्या दोन दिवसांत संसदेत गदारोळ केल्याप्रकरणी 100 हून अधिक खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. अशा स्थितीत विरोधी पक्षाचे खासदार मंगळवारी संसद भवनाबाहेर बसून आंदोलन करत होते. संसद भवनाबाहेर आंदोलन करत असताना तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची नक्कल केली, त्यावर उपराष्ट्रपती संतापले. या घटनेचे लज्जास्पद असे वर्णन करत उपराष्ट्रपती म्हणाले की, एक खासदार खिल्ली उडवत आहे आणि दुसरा खासदार त्या घटनेचा व्हिडिओ बनवत आहे हे हास्यास्पद आणि अस्वीकार्य आहे.

दरम्यान, कल्याण बॅनर्जी जेव्हा उपराष्ट्रपतींची नक्कल करत होते तेव्हा राहुल गांधी त्यांच्या मोबाईलवरुन त्यांचा व्हिडिओ बनवत होते. राहुल गांधींच्या या कृतीवर आता भाजप नेते काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत आहेत. यावर भाजप नेते गिरीराज सिंह यांनी ट्विट केले की, ''राहुल गांधींच्या निर्देशानुसार माननीय उपाध्यक्ष श्री जगदीप धनखड जी यांचा अपमान करण्यात आला. याचा बदला भारत नक्कीच घेईल आणि आज ज्या प्रकारे ते व्हिडिओ बनवत आहेत, उद्या तेच कॅमेऱ्यांपासून तोंड लपवतील.''

TMC MP
Rahul Gandhi: 'केंद्रात नरेंद्र मोदींचा पराभव करायचा असेल तर केसीआर...', राहुल गांधींचा तेलंगणात हल्लाबोल!

दरम्यान, विरोधी पक्षनेत्यांच्या या कृतीवर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही निशाणा साधला. त्यांनी लिहिले की, ''अहंकारी आघाडीच्या खासदारांच्या या 'रील' व्हिडिओने त्यांच्या क्षुद्रतेचा 'खरा' चेहरा देशासमोर आला. संसदेची, संसदीय प्रक्रियेची, संसदीय पद्धतीची ही जाहीर थट्टा देश पाहत आहे.''

'राहुल रील बनवण्यात व्यस्त आहे'

धर्मेंद्र प्रधान पुढे म्हणाले की, ''विरोधकांची अवस्था 'चोर मचाये शोर' सारखी आहे. काही सदस्यांचे निलंबन का केले, असा पेच आज देशासमोर आहे. असं कृत्य करताना त्यांना जराही लाज वाटली नाही. एवढ्या खालच्या पातळीवर कोण घसरणार याची अहंकारी आघाडीतील पक्षांमध्ये स्पर्धा आहे. कोणी जितके जास्त घसरेल तितकेच ते गर्विष्ठ युतीचे नेतृत्व करण्यास पात्र ठरतील. लोकशाहीच्या नावाखाली संसदेला वारंवार वेठिस धरणाऱ्या या लोकांना लोकशाही आणि लोकशाही प्रतीकांचा बिलकुल आदर नाही. सत्तेत असताना ते लोकशाहीला आपला गुलाम मानतात आणि सत्तेत नसताना ते लोकशाहीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांची दुहेरी भूमिका देशाला चांगलीच कळली आहे. यावेळी देशातील जनता काँग्रेस आणि अहंकारी युतीला या असभ्य कृतीसाठी माफ करणार नाही.''

TMC MP
Rahul Gandhi: 'कुली' नंतर, राहुल आता बनले 'कारपेंटर', आशियातील सर्वात मोठ्या फर्निचर मार्केटला दिली भेट

कल्याण बॅनर्जी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

संसद भवनाबाहेर बसलेल्या विरोधी पक्षाच्या खासदारांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल करत संसदेच्या कामकाजाचे चित्रण केले जे गेल्या काही दिवसांत अनेक वेळा तहकूब झाल्यामुळे विस्कळीत झाले आहे. 13 डिसेंबर रोजी संसदेच्या सुरक्षा भंगावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून अधिकृत निवेदनाची मागणी विरोधकांनी केली. कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनीही या घटनेचा निषेध करत कल्याण बॅनर्जी यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. मेघवाल म्हणाले की, 'सदस्याला (खासदार) सभागृह आणि सभापतींच्या अधिकाराची तमा न बाळगता निलंबित केले पाहिजे.'

याशिवाय, केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनीही उपराष्ट्रपतींची खिल्ली उडवणे अशोभनीय आणि अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी पोस्ट केली की, ''विरोधी खासदारांनी देशाच्या उपराष्ट्रपतींची ज्या प्रकारे खिल्ली उडवली ते अतिशय दुःखद आहे. मी या कृत्याचा निषेध करतो. संविधानिक पदांची प्रतिष्ठा आणि लोकशाही व्यवस्थेची प्रतिष्ठा राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.''

TMC MP
Rahul Gandhi: भाजपचे खासदार हे मंदिरातील मूर्तीसारखे; त्यांच्या हाती कसलीही सत्ता नाही... राहुल गांधींची टीका

माझ्या पार्श्वभूमीची अवहेलना करण्यात आली- जगदीप धनखड

यावर राज्यसभेच्या अध्यक्षांनीही निवेदन दिले. ते म्हणाले की, "अधोगतीला मर्यादा नाही. मी टीव्हीवर एक व्हिडिओ पाहिला, ज्यामध्ये एक मोठा नेता त्यांचा व्हिडिओ बनवत आहे, तर दुसरा खासदार कॉपी करत आहे. हे अशोभनीय आहे." या घटनेने राज्यसभा अध्यक्ष चांगलेच संतापले. माझी अवहेलना झाल्याचे त्यांनी सांगितले. 'माझ्या पार्श्वभूमीची खिल्ली उडवली गेली. माझ्या पदाची खिल्ली उडवली गेली. माझ्या कृषी पार्श्वभूमीची खिल्ली उडवली गेली. जेव्हा टीएमसीचे खासदार मिमिक्री करत होते तेव्हा राहुल गांधी, प्रमोद तिवारी, जयराम रमेश, मनोज झा, डी राजा, कार्ती चिदंबरम असे अनेक ज्येष्ठ नेते तिथे उपस्थित होते,' असे ते म्हणाले.

TMC MP
Lok Sabha Membership Of Rahul Gandhi: तोफ पुन्हा धडाडणार! राहुल गांधींना खासदारकी बहाल

संसदेत सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींच्या मुद्द्यावरुन विरोधक एकवटले

संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत विरोधी पक्ष एकवटले असून सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. संसदेच्या कामकाजात अडथळा आणल्याच्या आरोपावरुन आतापर्यंत 95 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात विरोधी पक्षाच्या 14 खासदारांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी 78 खासदारांना निलंबित करण्यात आले. मंगळवारी आणखी 48 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. एका अधिवेशनात सर्वाधिक खासदारांचे निलंबन झाले. यासह, विरोधी पक्षांच्या इंडिया ब्लॉकने राज्यसभेतील जवळपास निम्मे आणि लोकसभेतील एक तृतीयांश संख्याबळ गमावले.

या निलंबित खासदारांची मागणी आहे की, ज्या भाजप खासदाराच्या शिफारसीवर आरोपी संसदेत घुसले, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ते तशी मागणी करत आहेत, मात्र सरकार आमच्यावरच कारवाई करत आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही खासदारांचे निलंबन मागे घेण्यासाठी जगदीप धनखड यांना पत्र लिहिले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com