Funny Water Park Slide Fail Video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केले जातात, परंतु त्यापैकी मोजकेच कंटेंट युजर्सचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरतात आणि तुफान व्हायरल होतात. जे कंटेंट सर्वात हटके असतात किंवा जे पाहिल्यावर लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटते, नेटकरी अशा व्हिडिओंना डोक्यावर घेतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक भन्नाट आणि मजेदार व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला तुमचे हसू अजिबात आवरता येणार नाही. हा व्हिडिओ एका वॉटर पार्कमधील असून तिथे रील्स किंवा व्हिडिओ बनवण्याच्या नादात एका मुलीची कशी फजिती झाली, याचे मजेशीर दृश्य यात कॅमेऱ्यात कैद झाले.
या व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसते की, एक मुलगी वॉटर पार्कच्या स्लाईडवरुन खाली येत आहे. कदाचित आपला व्हिडिओ चांगला यावा किंवा सोशल मीडियासाठी सुंदर पोज देता यावी म्हणून ती अतिशय संथ गतीने, हळूहळू खाली सरकत येत होती. ती मुलगी अजून स्लाईडवरुन पूर्णपणे खाली उतरलीही नव्हती आणि पाण्याचा आनंद घेत होती, तितक्यात मागून एक दुसरी मुलगी त्याच स्लाईडवरुन अत्यंत वेगाने खाली घसरत येते. तिथे उपस्थित असलेला एक तरुण पहिल्या मुलीला सावध करुन स्लाईडवरुन बाजूला हटवण्याचा प्रयत्न करणारच, तोपर्यंत मागून वेगाने आलेली दुसरी मुलगी पहिल्या मुलीला थेट येऊन धडकते. ही धडक इतकी अचानक आणि वेगवान होती की पहिली मुलगी स्लाईडवरुन थेट हवेत उडून जोरात पाण्यात पडते.
मुलीसोबत घडलेल्या या अनपेक्षित आणि मजेशीर प्रसंगामुळेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. हा मजेशीर व्हिडिओ 'एक्स' वर @Queen510619151 नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला. हा व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये अतिशय रंजक शब्दांत लिहिले की, 'व्हिडिओच्या नादात ती हळूहळू खाली येत होती, आता तिचा खरोखरच व्हिडिओ बनला! ही धडक अगदी अचानक झाली.' हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होताच काही वेळातच हजारो लोकांनी तो पाहिला असून त्यावर मजेशीर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी स्वतःला हसण्यापासून रोखू शकलेले नाहीत. कमेंट सेक्शनमध्ये एका युझरने लिहिले की, 'ही धडक खरोखरच अचानक आणि अनपेक्षित होती.' तर दुसऱ्या एका युझरनेही तशाच प्रकारची कमेंट करत मुलीच्या (Girl) फजितीची मजा घेतली. अनेक युझर्सनी कमेंट बॉक्समध्ये हसणारे इमोजी पोस्ट करुन आपली प्रतिक्रिया दिली. व्हिडिओ बनवण्याच्या नादात आणि कॅमेऱ्यासमोर प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात अनेकदा कशा गमतीशीर घटना घडतात, याचेच हे एक उदाहरण ठरले असून हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.