Smriti Irani  Dainik Gomantak
देश

Loksabha Election 2024: ‘’स्मृती इराणींचा पराभव नक्की, निवडणुकीनंतर अमेठीहून गोव्यात पाठवणार’’; काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल

Loksabha Election 2024: लोकसभा निडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहे.

Manish Jadhav

Loksabha Election 2024: लोकसभा निडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहे. यातच, अवघ्या देशाचे अमेठी मतदारसंघाकडे लक्ष लागले होते. स्मृती इराणी यांच्याविरोधात राहुल गांधी निवडणुक लढवणार का नाही असे अनेक प्रश्न विचारले जात होते.

मात्र काल अखेर काँग्रेस पक्षाने अमेठीमधून कोण निवडणुक लढवणार हे स्पष्ट केले. राहुल गांधींच्या ऐवजी काँग्रेस पक्षाने दिग्गज नेते के.एल. शर्मा यांना स्मृती इराणी यांच्या विरोधात रिंगणात उतरवले. तर राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा पारंपारिक मतदारसंघ असलेल्या रायबरेलीमधून आपला उमेदवारी अर्ज भरला.

दरम्यान, अमेठीमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शुक्रवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला. बांसगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सदल प्रसाद यांना पाठिंबा देण्यासाठी आणि पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय कौडीराम येथे पोहोचले होते. जिथे त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले आणि प्रसारमाध्यमांसोबत पत्रकार परिषद घेतली.

दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) राजकीय तापमानाचा पारा वाढतच चालला आहे, अशा परिस्थितीत गोरखपूर झोनमधील लोकसभेच्या सहा जागांवर उमेदवारांमध्ये चुरस सुरु झाली आहे. पक्षाचे पदाधिकारी आणि बडे नेते त्यांच्या समर्थनार्थ प्रचारसभा घेण्यासाठी पोहोचण्याची प्रक्रियाही सुरु झाली आहे. जर गोरखपूर लोकसभा मतदारसंघ बांसगावबद्दल बोलायचे झाल्यास, हा मतदारसंघ देशातील सुरक्षित मतदारसंघापैकी एक मानला जातो. एकीकडे भाजपने या जागेवरुन आपले जुने उमेदवार कमलेश पासवान यांना मैदानात उतरवले आहे, तर सदल प्रसाद यांना काँग्रेसने तिकीट दिले आहे.

देशात सध्या लबाडांचे सरकार- अजय राय

काँग्रेस (Congress) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजय राय आज गोरखपूरमध्ये होते, तिथे त्यांनी भारतीय जनता पक्षाला चांगलंच फैलावर घेतलं. राय म्हणाले की, ‘’देशात सध्या लबाडांचे सरकार सुरु आहे. मात्र जनता आता त्यांच्या लबाडीला बळी पडणार नाही, यावेळी त्यांना सत्तेतून हाकलून देण्याचा निर्धार जनतेने केला आहे. बांसगाव मतदारसंघातून सदल प्रसाद यांचा विजय निश्चित आहे. सर्वांनी संघटित होऊन त्यांना विजयी करण्यासाठी कोणतीही कसर सोडू नये. अखिलेश जी, राहुल जी आणि इंडिया आघाडीचे बडे नेते त्यांच्या समर्थनार्थ येथे पोहोचणार आहेत.’’

स्मृती इराणींचा पराभव करुन त्यांना गोव्यात पाठवणार- अजय राय

भाजप आणि गोरखपूरचे उमेदवार रवी किशन यांनी राहुल गांधींना डरपोक म्हटले आहे, असे विचारले असता अजय राय म्हणाले की, ‘’गांधी परिवार कोणाला घाबरत नाही, या परिवारातील लोक देशासाठी शहीद झाले आहेत. राहिला अमेठीचा प्रश्न, तर आमचे उमेदवार किशोरी लाल यावेळी स्मृती इराणींचा पराभव करुन त्यांना गोव्यात पाठवतील.’’

बांसगाव लोकसभेचे उमेदवार सदल प्रसाद यांच्याबाबत पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमधील विरोधाच्या प्रश्नावर राय म्हणाले की, ‘’असे काही नाही, थोडा बेबनाव झाला. तोही दूर करण्यात आला आहे. निवडणुकीदरम्यान सर्वजण एका व्यासपीठावर एकत्र दिसतील आणि आमचे उमेदवार निश्चितपणे जिंकतील. अशाप्रकारच्या अफवा विरोधकांकडून पसरवल्या जात आहेत. याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही.’’ अजय राय बांसगाव लोकसभा उमेदवार सदल प्रसाद यांच्या समर्थनार्थ कौडीराम येथे पोहोचले होते. तिथे ते निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT