Rahul Gandhi: ''पीएम मोदींना संविधान रद्द करायचंय...'' भाजप खासदाराच्या वक्तव्यावर राहुल गांधींचा पलटवार

Lok Sabha Elections 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप आणि विरोधकांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. भाजप आणि कॉंग्रेसने पहिल्या टप्प्यातील आपल्या उमेदारांची यादी जाहीर केली आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiDainik Gomantak
Published on
Updated on

Rahul Gandhi Reaction On Karnataka BJP MP Ananth Kumar Hegde Comments: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप आणि विरोधकांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. भाजप आणि कॉंग्रेसने पहिल्या टप्प्यातील आपल्या उमेदारांची यादी जाहीर केली आहे. यादरम्यान, सत्ताधारी भाजपसह विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.

यातच, कर्नाटकचे भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे, ज्यात त्यांनी राज्यघटनेच्या बहुतांश भागांचे पुनर्लेखन करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी पलटवार केला. पंतप्रधान मोदी आणि भाजप संविधान नष्ट करु इच्छित असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही हल्ला चढवला.

Rahul Gandhi
Rahul Gandhi: ''त्यांना आजचा तरुण दिवसभर मोबाईलवर राहणारा, जय श्री राम म्हणणारा अन्...''; राहुल गांधींचा मोदींना टोला

राहुल गांधी म्हणाले की, ''संविधान बदलण्यासाठी 400 जागा हव्यात, असे भाजप खासदाराचे वक्तव्य म्हणजे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या संघ परिवाराच्या छुप्या हेतूची जाहीर घोषणा आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपचे अंतिम ध्येय बाबासाहेबांचे संविधान नष्ट करणे हे आहे. त्यांना न्याय, समानता, नागरी हक्क आणि लोकशाहीचा तिरस्कार आहे. समाजात फूट पाडून, माध्यमांना गुलाम बनवून, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणून, स्वतंत्र संस्थांवर कब्जा करुन, विरोधकांना संपवण्याचा कट रचून भारताच्या महान लोकशाहीला हुकूमशाहीत बदलायचे आहे.''

Rahul Gandhi
Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला देशाचे शत्रू का म्हटले? विद्यार्थ्यांना दिला 'हा' मेसेज

षड्यंत्र यशस्वी होऊ देणार नाही - राहुल गांधी

ते पुढे म्हणाले की, ''स्वातंत्र्यवीरांच्या स्वप्नांविरोधातील हे षड्यंत्र आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. संविधानाने दिलेल्या लोकशाही हक्कांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू. संविधानाचा प्रत्येक शिपाई, विशेषत: दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांनो, जागे व्हा, आवाज उठवा, इंडिया तुमच्या पाठीशी आहे.''

खरे तर, उत्तर कन्नडचे विद्यमान खासदार अनंतकुमार हेगडे यांनी लोकांना आवाहन केले की, तुम्ही सर्वांनी भाजपला 400 हून अधिक जागा जिंकून देण्यासाठी मदत करा. यामागचे कारणही त्यांनी सांगितले. हेगडे म्हणाले की, ''भाजपला 400 पेक्षा जास्त जागा यासाठी हव्यात की, काँग्रेस नेत्यांनी पूर्वी संविधानात बदल केले, मात्र हिंदू धर्माला अग्रस्थानी ठेवले नाही. आता हे बदलून आपल्याला धर्म वाचवायचा आहे.''

'घटना दुरुस्तीसाठी भाजपकडे राज्यसभेत बहुमत नाही'

ते पुढे म्हणाले की, ''लोकसभेत आमच्याकडे आधीच दोन तृतीयांश बहुमत आहे, मात्र राज्यसभेत आमच्याकडे संविधान दुरुस्तीसाठी बहुमत नाही. 400 अधिक जागा आम्हाला हे साध्य करण्यात मदत करेल.'' त्यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा कर्नाटक सरकार भारतीय राज्यघटनेबद्दल लोकांना शिक्षित करण्यासाठी राज्यव्यापी 'संविधान जागृती कार्यक्रम' आयोजित करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com