Shaista Parveen  Dainik Gomantak
देश

Umesh Pal Murder Case: अतिकची फरार पत्नी शाईस्ता परवीन 'माफिया' घोषित; शूटर साबीरसोबत...

Umesh Pal Murder Case: प्रयागराजमध्ये मारला गेलेला माफिया अतिक अहमदची फरार पत्नी शाईस्ता परवीनच्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

Manish Jadhav

Umesh Pal Murder Case: प्रयागराजमध्ये मारला गेलेला माफिया अतिक अहमदची फरार पत्नी शाईस्ता परवीनच्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. शाईस्ताविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या नव्या एफआयआरमध्ये तिला 'माफिया' म्हणून संबोधण्यात आले आहे.

साबीर नावाचा शूटर शाईस्तासोबत नेहमीच होता, असा दावाही या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान, प्रयागराज पोलिसांनी कौशांबी-प्रयागराजच्या कचार भागातही छापेमारी केली आहे.

शाईस्ता 2 मे रोजी येथेच राहिली

मिळालेल्या माहितीनुसार, शूटर साबीर उमेश पाल हत्याकांडातील आरोपींपैकी एक आहे. पोलिसांनी त्याच्यावर 5 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, 2 मे रोजी शाईस्ता राहत असलेल्या अतिन जफर नावाच्या व्यक्तीच्या घरावर छापा टाकल्यानंतर पोलिसांनी (Police) एफआयआर नोंदवला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती साबीरसोबत तिच्या मुलाचा मित्र अतीनच्या घरी राहिली होती. अतिनला 2 मे रोजी ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने शाईस्ताचा ठावठिकाणा पोलिसांना सांगितला आहे.

गेल्या महिन्यात शाईस्ताचा व्हिडिओ व्हायरल झाला होता

गेल्या महिन्यात, शाईस्ता परवीन एका लग्न समारंभात सहभागी झाल्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो समोर आले होते. फोटो आणि व्हिडिओंचे ठिकाण माहित नसले तरी, फरार असलेल्या शाईस्ता परवीनला पकडण्यासाठी यूपी पोलिसांनी या फोटो आणि क्लिपचा वापर केल्याचे एका मीडिया रिपोर्टमधून समोर आले आहे.

अतिकला 28 मार्च रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती

28 मार्च रोजी प्रयागराजच्या (Prayagraj) एमपी-एमएलए न्यायालयाने 2006 च्या उमेश पाल अपहरण प्रकरणात अतिक अहमदसह तीन जणांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. अहमदला एका प्रकरणात सुनावण्यात आलेली ही पहिलीच शिक्षा असल्याचा दावा केला जात होता, तर अतिकवर 100 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT