Umesh Pal Case: उमेश पाल हत्याकांडातील कॉन्स्टेबल हत्येचा व्हिडिओ समोर, बॉम्बस्फोट झाला अन्...

राघवेंद्र यांच्यावर बॉम्ब हल्ला झाल्याचे पाहताच महिला घाबरल्या. यानंतर काही लोकांनी त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.
Umesh Pal Case
Umesh Pal CaseDainik Gomantak
Published on
Updated on

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील उमेश पाल हत्याकांडातील आणखी सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये गुड्डू मुस्लिमने बॉम्ब फेकून कॉन्स्टेबल राघवेंद्रची हत्या केल्याचे दिसून येते. बॉम्बस्फोटानंतर कॉन्स्टेबल राघवेंद्र जमिनीवर कोसळले.

त्यानंतर परिसरात धावपळ निर्माण झाली होती. कॉन्स्टेबल जखमी झाल्याचे पाहून लोकांनी आधार देऊन त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ 24 फेब्रुवारीचा आहे. त्याच दिवशी प्रयागराज, यूपीमध्ये बॉम्ब आणि गोळ्यांनी उमेश पालचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाशी संबंधित अनेक सीसीटीव्ही समोर आले आहेत. आता जो नवीन व्हिडिओ समोर आला आहे, त्यात हवालदार राघवेंद्र जीव वाचवून घरात घुसल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्याचवेळी गुड्डू मुस्लिम याने मागून बॉम्बने हल्ला केला.

बॉम्बचा स्फोट होताच राघवेंद्र जमिनीवर कोसळले. स्फोटाचा आवाज आजूबाजूच्या घरातील महिलांनी ऐकताच त्यांनी बाहेर यायला सुरुवात केली. राघवेंद्र यांच्यावर बॉम्ब हल्ला झाल्याचे पाहताच महिला घाबरल्या. यानंतर काही लोकांनी त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. लोकांनी राघवेंद्रला आधार देऊन उचलले आणि घरात घेऊन गेले.

Umesh Pal Case
Goa Liquor Seized: दवाच्या नावाखाली दारूची वाहतूक, पुण्यात गोवा बनावटीची 66 लाख रूपयांचे मद्य जप्त

उमेश पाल हत्येप्रकरणी पोलिसांनी सदाकत नावाच्या व्यक्तीला गोळीबाराचा सूत्रधार म्हणून अटक केली होती, तर ड्रायव्हर अरबाज आणि विजय चौधरी नावाच्या शूटरचा मृत्यू झाला होता. पण या प्रकरणातील बहुतांश शूटर अजूनही पोलिसांच्या रडारच्या बाहेर आहेत. यामध्ये असद, मोहम्मद गुलाम, गुड्डू मुस्लिम आणि साबीर यांचा समावेश आहे.

आता पोलिसांनी आरोपींवरील बक्षीसाची रक्कम पाच लाखांपर्यंत वाढवली आहे, पण ते कुठे लपले आहेत? याबाबत सध्या पोलिसांकडे कोणतीही ठोस माहिती नाही.

24 फेब्रुवारी रोजी प्रयागराजच्या धुमनगंज भागात उमेश पाल यांची हत्या करण्यात आली होती. या गोळीबारात उमेश पाल यांच्यासह त्याच्या सुरक्षेतील दोन सरकारी बंदूकधारी संदीप निषाद आणि राघवेंद्र यांचाही मृत्यू झाला होता. उमेशची पत्नी जया पाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अतिक अहमद, त्याचा भाऊ अश्रफ, त्याची पत्नी शाइस्ता, असदसह दोन मुलांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com