Umesh Pal Murder Accused: उमेश पाल हत्या प्रकरणात मोठे यश, नाशिकमध्ये पकडला गेला गुड्डू मुस्लिम

Umesh Pal Murder Accused: उमेश पाल हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात गुंतलेल्या यूपी एसटीएफला मोठे यश मिळाले आहे.
 Guddu Muslim
Guddu Muslim Dainik Gomantak
Published on
Updated on

Umesh Pal Murder Accused: उमेश पाल हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात गुंतलेल्या यूपी एसटीएफला मोठे यश मिळाले आहे. यूपी एसटीएफने बॉम्बर गुड्डू मुस्लिम याला पकडले आहे. गुड्डू मुस्लिम उमेश पाल हत्याकांडातील आरोपी आहे. गुड्डू मुस्लिम महाराष्ट्रातील नाशिकमध्ये लपून बसला होता.

दरम्यान, यूपी एसटीएफने लोकेशन ट्रेस करुन गुड्डू मुस्लिमचा शोध घेतला आहे. गुड्डू मुस्लीम हा या हत्याकांडाची उकल करण्यात महत्त्वाचा दुवा ठरु शकतो, कारण मृत्यूपूर्वी अतिक अहमदचा भाऊ अश्रफ याचे शेवटचे शब्दही गुड्डू मुस्लिम होते.

अश्रफ गुड्डू मुस्लीम बोलताच हल्लेखोराने अतिक अहमदवर गोळी झाडली. त्यानंतर लगेचच अश्रफवर गोळ्या झाडण्यात आल्या.

 Guddu Muslim
Umesh Pal Case: उमेश पाल हत्याकांडातील कॉन्स्टेबल हत्येचा व्हिडिओ समोर, बॉम्बस्फोट झाला अन्...

दुसरीकडे, अतिक अहमदची पत्नी आणि उमेश पाल हत्याकांडातील आरोपी शाइस्ता परवीनही आज आत्मसमर्पण करु शकते, असे वृत्त आहे. पती अतिक आणि मेहुणा अश्रफ यांच्या अंत्यसंस्काराला शाईस्ता नक्कीच उपस्थित राहणार असल्याचे मानले जात आहे. शाइस्ता आपला मुलगा असदला शेवटचे पाहू शकली नाही.

तसेच, अतिक-अश्रफ यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक सुरु आहे. अलर्ट दरम्यान, सीएम योगींनी दर 2 तासांनी अधिकाऱ्यांना अहवाल देण्याच्या सूचना आहेत. सीएम योगी यांनी प्रयागराज (Prayagraj) सभेशिवाय त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

 Guddu Muslim
Sidhu Moosewala murder case:"सिद्धू 'मुसेवाला'ला गोल्डी ब्रारने मारलं होतं" लॉरेन्स बिश्नोईचा धक्कादायक खुलासा...

विशेष म्हणजे, प्रयागराजच्या एसआरएन हॉस्पिटलमध्ये (Hospital) अतीक आणि अश्रफचे पोस्टमॉर्टम थोड्याच वेळात केले जाणार आहे. दोघांवर आजच अंत्यसंस्कार होणार आहेत.

अतिक-अश्रफ यांना दफन करण्यासाठी दोन कबर खोदल्या जात आहेत. हत्येनंतर पोलिसांचा तपास अधिक गतिमान झाला आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या फॉरेन्सिक टीमने घटनेशी संबंधित नमुने घेतले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com