देशातील मोबाईल वापरकर्त्यांसाठी ट्रायने (Telecom Regulatory Authority of India) एक इशारा जारी केला आहे. ट्रायने मोबाईल वापरकर्त्यांना स्कॅमर्सपासून सावध राहण्यास सांगितलं आहे. वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून लोकांना सावध करण्यासाठी दूरसंचार नियामक वेळोवेळी हा इशारा देत राहतो.
सध्या घोटाळेबाज नवीन पद्धती वापरून लोकांची फसवणूक करत आहेत. लोकांना कॉल, मेसेज किंवा इतर कोणत्याही माध्यमातून आमिष दाखवले जाते आणि नंतर त्यांची फसवणूक केली जाते.
जनतेला दिलेल्या इशाऱ्यात दूरसंचार ट्रायने म्हटले आहे की, 'ट्राय कधीही मोबाइल नंबर/ग्राहकांची पडताळणी, डिस्कनेक्शन किंवा बेकायदेशीर कामासाठी कोणताही कॉल किंवा संदेश पाठवत नाही.'
जर तुम्हाला ट्रायच्या नावाने कोणताही कॉल किंवा मेसेज आला, तर सावधगिरी बाळगावी. संशयास्पद संदेश किंवा कॉल आल्यास https://sancharsaathi.gov.in/sfc/ द्वारे दूरसंचार विभागाला कळवा. देशभरात डिजिटल अरेस्ट फ्रॉडच्या घटना वाढत असल्याने TRAI ने नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
फसवणूक करणारे स्कॅमर्स TRAI किंवा इतर शासकीय संस्थांच्या नावाने कॉल करतात. नागरिकांना भिती दाखवून किंवा धमकावून खोट्या केसमध्ये अडकवण्याची भीती दाखवतात. अनेक लोक या फसवणुकीला बळी पडून स्वतःचं नुकसान करून घेतात.
ट्रायने स्पष्टपणे सांगितले आहे की, कोणतीही अधिकृत सरकारी एजन्सी नागरिकांना अशा प्रकारचे कॉल किंवा मेसेज पाठवत नाही. त्यामुळे अशा कॉल्सकडे दुर्लक्ष करा आणि त्यांची त्वरित तक्रार नोंदवा.
कोणत्याही संशयास्पद कॉल किंवा मेसेजला प्रतिसाद देऊ नका. कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका किंवा तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका. जेव्हा अशा कॉल्स किंवा मेसेजेस प्राप्त होतात, तेव्हा संबंधित नंबर त्वरित रिपोर्ट करा. https://sancharsaathi.gov.in/sfc/ या पोर्टलवर तक्रार नोंदवू शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.