Viral Video: कॅफे आहे की डान्स फ्लोअर? टिप मिळताच वेटर्स धरतात ठेका, ग्राहकांच्या पसंतीस उतरतोय 'हा' खास अंदाज; नेटकरी फिदा

Bengaluru Cafe Viral Video: बंगळुरुमधील हेन्नूर मेन रोडवर असलेले ‘कॅफे नुवियो’ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.
Bengaluru Cafe Viral Video
Bengaluru Cafe VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Bengaluru Cafe Viral Video: बंगळुरुमधील हेन्नूर मेन रोडवर असलेले ‘कॅफे नुवियो’ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. या कॅफेची एक अतिशय रंजक आणि आनंदी परंपरा लोकांची मने जिंकत असून ती पाहण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. या कॅफेमध्ये जेव्हा एखादा ग्राहक आनंदी होऊन तिथल्या टिप बॉक्समध्ये पैसे टाकतो, तेव्हा काउंटरवर असलेले कर्मचारी आनंदाने चक्क डान्स करायला सुरुवात करतात.

विशेष म्हणजे, काउंटरच्या शेजारीच एक पाटी लावण्यात आली आहे, ज्यावर अतिशय गमतीशीर भाषेत असे लिहिले आहे की, "जर तुम्ही टिप दिली, तर आमचे कर्मचारी तुमच्यासाठी डान्स करतील." ग्राहकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी आणि कॅफेमधील वातावरण नेहमी प्रसन्न ठेवण्याच्या उद्देशाने ही छोटी पण अनोखी संकल्पना राबवण्यात आली आहे.

Bengaluru Cafe Viral Video
Viral Video: मूर्खपणाचा कळस! बॅटरी तपासताना तोंडातच स्फोट; मोबाईल दुकानातील थरकाप उडवणारा 'तो' व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर या कॅफेचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून त्यामध्ये कॅफेमधील कर्मचारी कोणताही संकोच न बाळगता अगदी उत्साहाने नाचताना दिसत आहेत. या डान्सचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा कोणताही प्रोफेशनल डान्स नाही किंवा तो कोणाकडून शिकलेला नाही, तर तो कर्मचाऱ्यांच्या मनातील आनंद आणि उत्साहाचे प्रतीक आहे. जशी टिप बॉक्समध्ये पैसे पडल्याचा आवाज येतो, तसे कर्मचारी एकमेकांकडे पाहून गोड हसतात आणि तिथेच ताल धरतात. कॅफेच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. कर्मचारी ज्या साधेपणाने आणि प्रेमाने ग्राहकांचे स्वागत करत आहेत, त्याचे इंटरनेटवर भरभरुन कौतुक होत आहे.

Bengaluru Cafe Viral Video
Viral Video: फोटोसाठी हायवेच्या मधोमध बसलं जोडपं; अचानक कार आली अन्... तुम्हीच बघा पुढं काय झालं?

या आगळ्यावेगळ्या कल्पनेवर सोशल मीडिया (Social Media) युजर्संनी मजेशीर आणि कौतुकास्पद प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. एका युजरने म्हटले की, हे कॅफेचे वातावरण आणि कर्मचाऱ्यांच्या डान्स स्टेप्स इतक्या क्लासिक आहेत की तिथे जाऊन मिळणारा आनंद खरोखर 'पैसा वसूल' अनुभव देणारा आहे. काही युजर्संनी गमतीने असेही म्हटले की, जर कॅफेमध्ये खूप गर्दी असेल आणि त्याचवेळी वारंवार टिप मिळाली, तर कर्मचाऱ्यांना कामासोबत डान्स करणे हे एक मोठे आव्हान ठरेल.

Bengaluru Cafe Viral Video
Viral Video: ते आमचं बाळ...! कुत्र्याला सोबत नेण्यासाठी हैदराबादच्या जोडप्याने मोजले तब्बल '15 लाख'; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

आणखी एका युजरने कमेंट केली की, व्हिडिओमधील कर्मचाऱ्यांच्या साधेपणाने संपूर्ण इंटरनेटचे मन जिंकले आहे आणि तो लवकरच या कॅफेला भेट देऊन हा डान्स प्रत्यक्ष पाहणार आहे. जेवणाच्या दर्जेदार चवीसोबतच मिळणारे हे छोटेखानी मनोरंजन ग्राहकांचा दिवस अधिक संस्मरणीय बनवत असल्याचे मत अनेकजण व्यक्त करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com