Goa Accident: अपघातामुळे तरुणाचे आयुष्य 'अंधकारमय'; 1.30 कोटींची भरपाई द्या, विमा कंपनीला आदेश

Insurance Company Compensation: इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीला त्याला १ कोटी ३० लाख ४४ हजार ९४ रुपयांची भरपाई देण्याचा आदेश दिला
Accident News
Accident NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Accident Insurance Claim

सत्तरी: सालेली-वाळपई येथे झालेल्या अपघातामुळे २७ वर्षीय तरुण शंभर टक्के अपंग झाला होता, त्यामुळे त्याने भरपाईसाठी केलेल्या अर्जावर मोटार वाहन दावे लवादाने निर्णय देताना कारचा मालक तसेच इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीला त्याला १ कोटी ३० लाख ४४ हजार ९४ रुपयांची भरपाई देण्याचा आदेश दिला. ही भरपाई अर्ज केल्यापासून ६ टक्के व्याजासह द्यावी, असे आदेशात लवादाने म्हटले आहे.

या अपघातात याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला आता पुढील संपूर्ण आयुष्य व्हिलचेअरवरूनच काढावे लागणार आहे. तो तरुण वयात असताना अपंगत्व आल्याने त्याचे पुढील आयुष्यच अंधकारमय झाले आहे. तो स्वतःहून आपली स्वतःची कामे करू शकणार नाही. त्याला आलेले अपंगत्व न सुधारण्यासारखे आहे. त्याला हा आजार या अपघातामुळेच झाल्याचे अनेक पुरावे सादर करण्यात आलेले आहेत.

Accident News
Goa Accident: गोव्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना सरकारचा दिलासा; भरपाई योजनेअंतर्गत मिळणार लाखो रुपयांची मदत

विमा कंपनीने भरपाईला विरोध करताना दिलेली माहिती योग्य नाही, त्यामुळे ही भरपाई नाकारता येत नाही. तो कामाला होता व त्याला प्रतिमाह ३१ हजार रुपये वेतन होते. या अपघातामुळे अपगंत्व आल्याने त्याला नोकरी गमवावी लागली आहे, असे निरीक्षण मोटार वाहन दावे लवादाने केले आहे. या अर्जावरील सुनावणीवेळी विमा कंपनीने हा अपघात चालकाच्या भरधाववेगाने गाडी चालविल्याने झाला, असा मुद्दा उपस्थित केला होता, मात्र लवादाने तो फेटाळत वरील आदेश दिला.

अपघातामुळे अपंगत्व; १.३० कोटीची भरपाई द्या

१९ डिसेंबर २०१७ रोजी भरपाईचा दावेदार वाली आगा हा गाडीने पर्ये - साखळी येथील मॅनेजमेंट कॉलेजकडून मित्रांसमवेत गाडीने सालेलीच्या दिशेने मध्यरात्रीच्या सुमारास येत होता. त्यावेळी कमलुद्दीन सयद महम्मद शेख (३४) हा गाडी चालवत होता. गाडीचा वेग अधिक होता. सालेली येथे पोहचल्यावर रस्त्यावर अचानक गुरे रस्ता ओलांडत असल्याने गाडी उजव्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला. त्याचे गाडीवरील नियंत्रण गेले व गाडीने रस्ताच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला जोरदार धडक दिली. गाडीमधील चालकासह सर्वजण जखमी झाले. त्यांना सुरुवातीला साखळी इस्पितळात दाखल केल्यानंतर गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी पाठवण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com