Faridabad police disclose Holiday Package Scam Dainik Gomantak
देश

स्वस्तात गोवा, दुबई ट्रिपचे आमिष दाखवून पर्यटकांची लाखों रूपयांची फसवणूक; चौघे गजाआड

हॉलिडे पॅकेज घोटाळ्याचा पर्दाफाश, आणखी दोघांचा शोध सुरू

Akshay Nirmale

Faridabad police disclose Holiday Package Scam: गोव्यासह, अमेरिका, दुबई, न्यूझीलंड, इंडोनेशिया आणि यूरोप यात्रा स्वस्तःत घडवून आणतो, असे सांगत लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आले आहे. फरिदाबाद पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात पंचाबमधील मोहालीतून चार जणांना अटक केली आहे.

फरिदाबादच्या एका रहिवाशाने याबाबत तक्रार केली होती. त्या तक्रारीत म्हटले आहे की, त्याला एका ट्रॅव्हल कंपनीतून फोन आला होता. त्यामध्ये दुबई आणि गोव्यासाठी स्वस्तःत हॉलिडे पॅकेज देण्याचा दावा केला होता.

त्यात त्याची 1 लाख 45 हजार रूपयांची फसवणूक केली गेली आहे. फरिदाबाद सायबर पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तक्रारीत म्हटले आहे की, कंपनीचे अधिकारी फरिदाबाद येथे भेटण्यासाठी आले. तेव्हा क्रेडिट कार्डचा तपशील घेतला गेला. 10 वर्षात एकूण 75 रात्री आंतरराष्ट्रीय प्रवास अशा पॅकेजपैकी एक पॅकेज मला आवडले होते.

त्यानंतर संशयितांच्या मेल आयडीवरून एका हॉटेलकडून कन्फर्मेशन मेल आला. त्यामध्ये माझ्या क्रेडिट कार्डवरून 1 लाख 45 हजार रूपये वापरल्याचे सांगितले गेले.

त्यानंतर मी दिल्ली कार्यालयात गेलो पण ते बंद होते. तिथे कळाले की अनेकांची अशा पद्धतीने फसवणूक झाली आहे. स्वस्तःतील हॉलिडे पॅकेजसाठी अनेकांची फसवणूक केली गेली आहे. त्यांचे दर बाजारातील दरांपेक्षा कमी होते.

त्यानंतर फरिदाबाद पोलिसांनी तुषार, गजेंद्र, अमन आणि वंश अशा चौघांना अटक केली आहे.

नकली वेबसाईट, गुगलवर जाहिराती

फरिदाबादचे पोलिस अधिकारी सूबे सिंह यांनी सांगितले की, संशयितांनी मूळ हॉलिडे एजन्सीजचे नाव, वैशिष्ट्ये कॉपी केली. त्याआधारे नकली वेबसाईट बनवली. गुगलवर जाहीराती देत होते. ते खरे मानून अनेकजण त्यांना कॉल करायचे. त्यातून त्यांची फसवणूक होत होती.

आणखी दोघांचा शोध सुरू

पोलिसांनी या चौघांकडून तीन फोन, दोन सिम कार्ड, डेबिट कार्ड, एक चेक बुक आणि 32,000 हजार रूपये रोकड जप्त केली. तुषार हा बिहारच्या समस्तीपुरचा आहे. गजेंद्र फिरोजाबादचा आहे. अमन उत्तरप्रदेशमधील हरदोईचा आहे तर वंश दिल्लीचा आहे. आणखी दोघे जण फरार आहे. त्यांचा शोध सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dead Whale Fish: तळपण समुद्रकिनाऱ्यावर आढळला 30 फूट लांब कुजलेल्या अवस्थेतील व्हेल मासा

Test Record: विराट की पुजारा? 103 कसोटीनंतर कुणाचा रेकॉर्ड आहे खास; वाचून वाटेल आश्चर्य

Barge Sank: समुद्रात असलेल्या जहाजाच्या अवशेषांनी घात केला; मुरगावात लोखंडी प्लेट्सने भरलेल्या बार्जला जलसमाधी, 8 खलाशी बचावले

Shubman Gill Video: 'मी पण पाकिस्तानी फलंदाज नाही...', शुभमन गिलचं सडेतोड उत्तर; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

...अन्यथा मनोहर पर्रीकरांना खोटारडे ठरवा; मंत्री माविन यांच्याविरोधात गोवा सरकार उच्च न्यायालयात जाणार का? चोडणकरांचा सवाल

SCROLL FOR NEXT