Goa Monsoon 2023: गोव्यात यंदाच्या पावसाळ्यात जूनच्या पहिल्या तीन आठवड्यात पावसाने पाठ फिरवली होती. तथापि, गेल्या सात दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे जूनमधील पावसाची बरीच तुट भरून निघाली आहे.
गोव्यात 1 ते 30 जून या काळात एकूण 655 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तो एरवीच्या 914 मिलीमीटर पावसाच्या तुलनेत आतापर्यंत 28 टक्के कमी आहे.
दरम्यान, राज्याच्या कमाल तापमानात आणखी 2 अंश सेल्सिअसची घसरण झाली असून शुक्रवारी पणजीत 27.7 अंश सेल्सिअस तापमान होते.
दरम्यान, संपूर्ण देशाचा विचार करता देशातील पावसात यंदा 10 टक्के तुट आहे. त्या तुलनेत गोव्याची पावसाची तूट मोठी आहे. राज्यातील 36 हवामानशास्त्रीय उपविभागांपैकी 17 अपुरा आणि 2 ठिकाणी अधिक अपुरा पाऊस झाला.
जूनमध्ये केवळ तीन उपविभागांमध्ये अधिक जास्त, सात उपविभागांमध्ये जास्त आणि सात उपविभागांमध्ये साधारण मान्सून झाला आहे.
दरम्यान, जूनच्या अखेरच्या दिवशी अग्निशमन दलाला झाडे पडल्याबाबतचे एकूण सोळा कॉल आले होते, अशी माहिती आहे. राज्यात मान्सून जूनच्या अखेरीस सक्रिय झाला, त्यामुळे जून महिन्यातील पावसाची मोठी तूट कमी झाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.