Kapil Sibal Dainik Gomantak
देश

समाजवादी पक्षाकडून कपिल सिब्बल जाणार राज्यसभेवर

समाजवादी पक्षाने कपिल सिब्बल, डिंपल यादव आणि जावेद अली यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

विधानसभा निवडणुकीचा हंगाम संपत असतानाच, आता राजकीयदृष्ट्या भारतातील सर्वात मोठे राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभा निवडणुकीबाबत खळबळ उडाली आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, पक्षाने आपल्या कोट्यातून कोणत्या नेत्यांना राज्यसभेवर पाठवायचे याचा निर्णय घेतला आहे. समाजवादी पक्षाने कपिल सिब्बल, डिंपल यादव आणि जावेद अली यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अखिलेश यादव (Akhilesh Yadav) 1 जून रोजी दिल्लीत आले होते, जिथे हे सर्व दावेदार पोहोचले होते. समाजवादी पक्षाने राज्यसभेवर पाठवलेल्या यादीत सर्वात धक्कादायक नाव काँग्रेसचे दिग्गज नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांचे आहे. कपिल सिब्बल यांनी समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) दिग्गज नेते आझम खान यांची केस लढवली होती.

महाराष्ट्र आणि झारखंडमधूनही सिब्बल संधीच्या शोधात

आझम खान यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सांगितले होते की, 'माझ्या विनाशात माझ्या प्रियजनांचा हात आहे.' अशा स्थितीत समाजवादी पक्षाच्या मदतीने सिब्बल राज्यसभेवर गेले तर आझम यांची नाराजी दूर होईल. तसेच समाजवादी पक्षालाही मोठा नेता आणि कायदेशीर सल्लागार मिळेल. मात्र, कपिल सिब्बल यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस पक्ष अजूनही प्रयत्नशील आहे. दुसरीकडे, सिब्बल झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना कायदेशीर सल्ला देत आहेत. अशा परिस्थितीत या दोन ठिकाणांहून चर्चा झाली नाही, तर उत्तर प्रदेशचा मार्ग मोकळा आहे.

एका मुस्लिम आणि एका मागासवर्गीय नेत्याला मिळणार तिकीट!

मिळालेल्या माहितीनुसार, मुस्लिम नेत्यालाही राज्यसभेवर पाठवायला हवे, असे अखिलेश यादव यांचे मत आहे. याची माहिती मिळताच अनेक दावेदार समोर आले आहेत. यामध्ये इम्रान मसूद, सलीम शेरवानी आणि जावेद अली यांची नावे समोर येत आहेत. त्याचवेळी तिसरा खासदार म्हणून मागासलेल्या नेत्याला पाठवण्याचे मनसुबे पक्षाने तयार केले आहेत. अशा परिस्थितीत डिंपल यादव यांचे नाव या सगळ्यात आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या 11 जागांवर निवडणूक होणार आहे. अशा स्थितीत भारतीय जनता पक्षाचा 7 जागांवर दावा आहे. तर समाजवादी पक्षाचा 3 जागांवर. एका जागेसाठी फसगत झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT