'हिंदूही गोमांस खातात', काँग्रेस नेते सिद्धरामय्या म्हणाले- मला हवे असेल तर ते खाईन

काँग्रेस नेते सिद्धरामय्या (Congress leader Siddaramaiah) यांनी कर्नाटकात पुन्हा एकदा गोमांसाचा वाद निर्माण केला आहे.
Congress leader Siddaramaiah
Congress leader Siddaramaiah Dainik Gomantak
Published on
Updated on

काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी कर्नाटकात पुन्हा एकदा गोमांसाचा वाद निर्माण केला आहे. लोक हवे तेव्हा गोमांस खाऊ शकतात, असे त्यांनी म्हटले आहे. सोमवारी एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही घणाघाती आरोप केले. विशेष म्हणजे कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पाळीव प्राण्याविषयी नवा कायदा केला आहे. (Congress leader Siddaramaiah says Hindus also eat beef)

दरम्यान, तुमकूर जिल्ह्यात एका कार्यक्रमादरम्यान काँग्रेस (Congress) नेते म्हणाले, 'मी हिंदू आहे. मी अजून गोमांस खाल्लेले नाही, पण मला हवे असल्यास मी खाऊ शकतो. मला प्रश्न विचारणारे तुम्ही कोण आहात?' गोमांस खाणारे हे एकाच समाजाचे नसतात, हिंदूही गोमांस खातात, ख्रिश्चनही गोमांस खातात. हे मी कर्नाटक (Karnataka) विधानसभेतही बोललो होतो. गोमांस न खाण्यास सांगणारे तुम्ही कोण आहात?'

Congress leader Siddaramaiah
कॉंग्रेसची पुढच्या वाटचालीची दिशा ठरवण्याची जबाबदारी आता या 16 जणांच्या खांद्यावर...

तसेच, आरएसएसवर (RSS) धर्मांमध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोपही सिद्धरामय्यांनी केला. 'ते व्यक्ती-व्यक्तीमध्ये भेद करतात,' असेही ते म्हणाले. हवं तेव्हा गोमांस खाऊ शकतो, असं सांगून ते पुढे म्हणाले, 'खायची सवय आहे, आणि तो माझा हक्कही आहे. फक्त मुस्लिमच गोमांस खातात का?' विशेष म्हणजे अलीकडेच कर्नाटकात हलाल मांसाचा मुद्दा ऐरणीवर आला होता.

Congress leader Siddaramaiah
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आरोग्यमंत्री विजय सिंग यांची केली हकालपट्टी

याशिवाय, राज्य सरकारने 2021 मध्ये केलेल्या कायद्यानुसार जनावरांची खरेदी-विक्री, कत्तल करणे बेकायदेशीर आहे. यामध्ये गायी, म्हशी, बैल यांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे, म्हशी आणि 13 वर्षे वयाच्या आजारी गुरांना या कायद्यांतर्गत सूट देण्यात आली असली तरी पशुवैद्यकाच्या प्रमाणपत्रानंतरच त्यांची कत्तल करता येणार आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत दंड आणि सात वर्षांची शिक्षा होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com