मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आरोग्यमंत्री विजय सिंग यांची केली हकालपट्टी

विजय सिंग यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळाल्यानंतर भगवंत मान यांनी विजय सिंगला यांना मंत्रीपदावरून हटवले आहे.
Bhagwant Mann
Bhagwant MannDainik Gomantak
Published on
Updated on

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भ्रष्टाचाराबाबत कठोर वृत्ती दाखवत मोठी कारवाई केली आहे. भगवंत मान यांनी आपले आरोग्यमंत्री विजय सिंगला यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून हटवले आहे. वृत्तानुसार, विजय सिंगला यांनी कंत्राटे देताना टक्केवारी कमिशनची मागणी केली होती. विजय सिंग यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळाल्यानंतर भगवंत मान यांनी विजय सिंगला यांना मंत्रीपदावरून हटवले आहे.

Bhagwant Mann
कॉंग्रेसची पुढच्या वाटचालीची दिशा ठरवण्याची जबाबदारी आता या 16 जणांच्या खांद्यावर...

विजय सिंग यांच्यावर कारवाई करताना भगवंत मान म्हणाले, "अरविंद केजरीवाल यांनी मला सांगितले की, मी लाचखोरी, एका पैशाची बेईमानी सहन करू शकत नाही. मी वचन दिले की असे पंजाबमध्ये होणार नाही. चळवळीतून बाहेर पडलेले आम्ही लोक आहोत आणि ते आंदोलन भ्रष्टाचाराच्या विरोधात होते. म्हणून भ्रष्टाचार करणारा कुणीही असो त्याच्यावर कारवाई केली जाईल."

Bhagwant Mann
15 वर्षीय मुलाने मुख्यमंत्री योगींवर केली आक्षेपार्ह पोस्ट

भगवंत मान पुढे म्हणाले की, 'एक प्रकरण माझ्या लक्षात आले. या प्रकरणात माझ्या सरकारचे मंत्री सहभागी होते. एका करारात माझ्या सरकारचे मंत्री एक टक्का कमिशन मागत होते. या प्रकरणाची माहिती फक्त मलाच होती. हे प्रकरण दडपता आले असते. पण असे करून मला कुणाची फसवणूक करायची नाही. त्यामुळे मी त्या मंत्र्यावर कारवाई करत आहे. त्यावर तातडीने कारवाई करण्यात येत आहे. विजय सिंग असे या मंत्र्याचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.'

विजय सिंगला यांनी आपल्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप मान्य केले आहेत. आप सरकारने हे पाऊल पहिल्यांदा उचललेले नाही, याआधीही आपने आपल्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढून टाकले होते. 'आप'ने अशी कारवाई करण्याची ही दुसरी वेळ आहे, त्याआधी 2015 मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अन्न पुरवठा मंत्री पदावरून हटवले होते. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची चर्चा त्यांनी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com