RPG Dainik Gomantak
देश

मोहालीतील पंजाब पोलिसांच्या गुप्तचर कार्यालयात स्फोट

मोहालीतील पंजाब पोलिसांच्या गुप्तचर कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर सोमवारी रात्री रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड (RPG) फेकण्यात आल्याने स्फोट झाला.

दैनिक गोमन्तक

पंजाबमधील मोहालीमध्ये सोमवारी रात्री एक मोठी घटना घडली आहे. मोहालीतील पंजाब पोलिसांच्या (Punjab Police) गुप्तचर विभागाच्या इमारतीत मोठा स्फोट (Blast in Mohali) झाला. रॉकेटसदृश वस्तू पडल्यानंतर ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर एकच खळबळ उडाली. सध्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. आजूबाजूच्या इमारतींनाही याचा फटका बसल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर गुप्तचर विभागाची ही इमारत सुहाना साहिब गुरुद्वाराजवळ आहे.

दरम्यान, इमारतीला लक्ष्य करुन हल्ला करण्यात आला आहे. स्फोटानंतर इमारतीभोवती मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संपूर्ण परिसरात पोलीस (Police) बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी साडेसातच्या सुमारास रॉकेट लाँचरने हल्ला करण्यात आला. त्यानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. हे रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड आहे. पंजाब (Punjab) पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ते फेकण्यात आले. आता मुख्यालयाबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

याशिवाय, समोर आलेल्या फोटोनुसार स्फोटके तिसऱ्या मजल्यावर पडल्यानंतर खिडक्यांच्या काचा फुटल्या होत्या. गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर असा हल्ला देखील मोठ्या गुप्तचर त्रुटीकडे लक्ष वेधतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: सभापती तवडकर- मंत्री गावडे यांच्यातील वाद टोकाला; राजीनामा देण्याचा तवडकरांचा भाजपला इशारा

Cash For Job Scam: प्रिया यादवला तीन दिवसांची पोलीस कोठडी; डिचोली न्यायालयाचा झटका!

Goa News Updates: '...तर मी सभापतीपदाचा राजीनामा देईन' तवडकरांचा सरकारला थेट इशारा; वाचा दिवसभरातील घडाामोडी

IFFI Goa 2024: यंदाचा इफ्फी सोहळा दणक्यात! मडगाव आणि फोंड्यात लागणार सहा एक्स्ट्रा स्क्रीन्स

Government Job Scam: सरकारी नोकरीचे 'मायाजाल'! वेतन, ऐषोरामाचे आकर्षण; 'रोखी'मुळे होणारा मनस्ताप

SCROLL FOR NEXT