भाजप नेते तजिंदर सिंग बग्गा यांचा त्रास कमी होताना दिसत नाहीये. मोहाली न्यायालयाने तजिंदर पाल सिंग बग्गा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच 'बग्गाला (Tajinder Bagga) बेकायदेशीररित्या सोडण्यात आले', असे न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणावर टिप्पणी करताना न्यायालयाने म्हटले की, 'दिल्ली पोलिस (Police) आणि हरियाणा (Haryana) पोलिसांची कारवाई बेकायदेशीर होती.' (A Mohali court has said that Tajinder Bagga was illegally released by the Punjab police)
दरम्यान, तजिंदर पाल सिंग बग्गा यांच्याविरुद्ध वॉरंट जारी करताना न्यायालयाने खडे बोल सुनावले. न्यायालयाने म्हटले, "आरोपी (Bagga) ला पंजाब पोलिसांकडून जबरदस्तीने बेकायदेशीररित्या सोडण्यात आले. पंजाब पोलिसांचे डीएसपी दिल्ली पोलिसांना अटकेची माहिती देण्यासाठी जनकपुरी पोलिस ठाण्यात गेले, परंतु दिल्ली पोलिसांनी कोणतीही नोंद केली नाही. आरोपीला तपासात सामील होण्यासाठी अनेक संधी देण्यात आल्या होत्या, मात्र तरीही तो तपासात सहभागी झाला नाही. त्यामुळे अजामीनपात्र वॉरंट जारी करणे आवश्यक आहे.''
तसेच, मोहाली कोर्टाने पंजाब (Punjab) पोलिसांना तजिंदर पाल सिंग बग्गाला अटक करुन कोर्टात हजर करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी कोर्टात पुढील सुनावणी 23 मे रोजी होणार आहे.
याशिवाय, मोहाली सायबर सेलमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात तजिंदर पाल सिंग बग्गाला अटक करण्यासाठी पंजाब पोलीस शुक्रवारी दिल्लीत आले होते. याप्रकरणी बग्गा यांना तपासात सहभागी होण्यासाठी पाच वेळा नोटिसा पाठवण्यात आल्या, मात्र ते पोहोचले नाही. यानंतर पंजाब पोलिसांनी शुक्रवारी सकाळी त्यांच्या दिल्लीतील घरी पोहोचून त्यांना अटक केली. मात्र पंजाब पोलिसांच्या पथकाला हरियाणा पोलिसांनी कुरुक्षेत्रातच रोखले, त्यानंतर दिल्ली पोलिसांना पाचारण करुन त्यांच्या ताब्यात देण्यात आले. यानंतर पंजाब पोलिसांनी मोहाली न्यायालयात धाव घेतली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.