Jasprit Bumrah Ruled Out of Champions Trophy 2025
चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यास आता काही दिवसच शिल्लक आहेत, पण त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. बीसीसीआयनं (Board of Control for Cricket in India) सोशल मिडिया 'एक्स'वर पोस्ट करत याबाबत माहिती दिलीय.
पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह आता आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. भारतासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. निवड समितीनं बुमराहच्या जागी हर्षित राणाला संघात स्थान दिलं आहे. बुमराहची अनुपस्थिती टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे.
दुखापतीमुळे बुमराह खेळू शकणार नाही, अशी ही दुसरी आयसीसी स्पर्धा असेल. यापूर्वी, पाठीच्या दुखापतीमुळे तो ऑस्ट्रेलियात झालेल्या २०२२ च्या टी-२० विश्वचषकालाही मुकला होता.
चॅम्पियन्स ट्रॉफी संघात झालेला आणखी एक बदल म्हणजे युवा फलंदाज यशस्वी जयस्वालचं नाव अंतिम १५ खेळाडूंच्या यादीतून वगळण्यात आलं असून त्याच्या जागी वरुण चक्रवर्तीला संधी देण्यात आली आहे.
मात्र, राखीव खेळाडूंच्या यादीत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे यांच्यासोबत त्याचा समावेश करण्यात आला आहे.आयसीसीने सर्व संघांना चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्यांच्या संघात बदल करण्याची परवानगी ११ फेब्रुवारीपर्यंत दिली होती. त्यामुळे आता कोणताही संघ बदल करू शकणार नाही.
१९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होणार असून भारताची पहिली लढत २० तारखेला बांगलादेशविरुद्ध होणार आहे, तर २३ तारखेला टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध खेळायचं आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी टीम इंडियाचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये ८ संघांमध्ये एकूण १५ सामने होतील. संघांना २ गटात विभागण्यात आलं आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच गट-अ मध्ये आहेत. त्यांच्यासोबत इतर २ संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश आहेत. तर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांना गट ब मध्ये स्थान देण्यात आलं आहे.
सर्व ८ संघ आपापल्या गटात ३-३ सामने खेळतील. यानंतर, प्रत्येक गटातील टॉप-२ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. पहिला उपांत्य सामना दुबईमध्ये होईल, तर दुसरा लाहोरमध्ये. यानंतर अंतिम सामना खेळवला जाईल. अशा परिस्थितीत, जर एखादा संघ अंतिम फेरीत पोहोचला तर तो स्पर्धेत एकूण ५ सामने खेळेल.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी गट
गट अ - पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, बांगलादेश
गट ब - दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड
चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचे सामने
२० फेब्रुवारी - बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई
२३ फेब्रुवारी - पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई
२ मार्च - न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.