Champions Trophy 2025: "पाकिस्तान भारताचा पराभव करणार..." शोएब अख्तरच्या भविष्यवाणीनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या!

Champions Trophy: जगभरातील क्रिकेट चाहते चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी उत्सुक आहेत. क्रिकेट दिग्गज देखील या स्पर्धेची आतुरतेनं वाट पाहत आहेत.
Champions Trophy 2025
Champions Trophy 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

2025 ICC Champions Trophy

जगभरातील क्रिकेट चाहते चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी उत्सुक आहेत. क्रिकेट दिग्गज देखील या स्पर्धेची आतुरतेनं वाट पाहत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार आहे. माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल सतत भाकितं करत आहेत.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने एक मोठं विधान करून खळबळ उडवून दिली आहे. अफगाणिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचेल असा दावा त्यानं केला आहे. अख्तरने टीम इंडियाच्या पराभवाचा दावाही केला आहे.

शोएब अख्तरने एका मुलाखतीत बोलताना अफगाणिस्तान क्रिकेट संघाचं कौतुक केलं आहे. तो म्हणाला की, भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तानला पहायचं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तान संघ ऑस्ट्रेलियाला हरवताना आपल्याला पाहायचं आहे," असं शोएब अख्तर म्हणाला.

Champions Trophy 2025
FC Goa: '..आम्हाला झगडावे लागेल', ओडिशा विरुद्धच्या सामन्यांनंतर प्रशिक्षक मार्केझ यांची प्रतिक्रिया; आक्रमक खेळाचे केले कौतुक

याशिवाय अख्तरने असा दावाही केला आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेज सामन्यात पाकिस्तान संघ भारताला हरवेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २३ फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये खेळला जाईल. पण शोएब अख्तरला विश्वास आहे की, टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचेल. शोएबला अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान सामना पाहायचा आहे.

टीम इंडिया 'या' संघांशी भिडणार

टीम इंडिया २३ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानशी सामना करण्यापूर्वी, २० फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये बांगलादेशशी सामना करेल. २ मार्च रोजी भारतीय संघाचा शेवटचा गट सामना न्यूझीलंडशी होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com