TAPAS DRDO Drone Crashes During Trial In Karnataka: डीआरडीओचे तपस ड्रोन ट्रायल फ्लाइट दरम्यान क्रॅश झाला आहे. कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील एका गावातील शेतात रविवारी सकाळी कोसळले. हे ड्रोन चाचणीसाठी उड्डाण करत असताना तांत्रिक बिघाड होऊन ते शेतात पडले.
शेतात ड्रोन कोसळल्यानंतर घटनास्थळावर स्थानिकांची गर्दी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस व डीआरडीओचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले.
मिळालेल्या माहितीनुसार, तपस असे अपघात झालेल्या ड्रोनचे नाव आहे. चित्रदुर्ग जिल्ह्यातील एका गावाजवळ हा अपघात झाला. जिल्ह्यातील हिरियुर तालुक्यातील मधील वड्डीकेरे गावाबाहेरील शेतात तपस 07A-14 ड्रोन कोसळले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीआरडीओ ड्रोन चाचणी उड्डाण करत असताना ही घटना घडली.
व्हिडिओ समोर आला
अपघातानंतर ड्रोन तुटून त्याचे काही भाग विखुरल्याचे या घटनेशी संबंधित व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मिडीयावर प्रसिध्द झाले आहेत. अपघाताच्या वेळी मोठा आवाज ऐकून आल्याने गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठून स्थानिक अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली.
संरक्षण अधिकार्यांनी एएनआयला सांगितले "कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील एका गावात चाचणी उड्डाण करताना डीआरडीओने विकसित केलेले तपस ड्रोन क्रॅश झाले. डीआरडीओ या अपघातामागील कारणांबाबत संरक्षण मंत्रालयाला माहिती देत आहे. तसेच विशिष्ट कारणांचा तपास सुरू आहे."
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.