Daughter Cannot Be Punished For Father's Mistake Says Delhi High Court
Daughter Cannot Be Punished For Father's Mistake Says Delhi High CourtDainik Gomantak

वडिलांच्या चुकीची शिक्षा मुलीला देता येणार नाही : हायकोर्ट

दिशाच्या वडिलांसह तीन जणांना इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून आयात केलेल्या शस्त्रांसह पकडण्यात आले होते.
Published on

Daughter Cannot Be Punished For Father's Mistake Says Delhi High Court:

दिल्ली उच्च न्यायालयाने 26 वर्षीय राष्ट्रीय महिला नेमबाज दिशा लांगन (Disha Langan) विरुद्ध सीमा शुल्क कायद्यांतर्गत फौजदारी तक्रार रद्द करण्याचे आदेश दिले. वडिलांच्या कृत्यासाठी खेळाडूला शिक्षा होऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायमूर्ती सौरभ बॅनर्जी म्हणाले की दिशाविरुद्ध सीमाशुल्क कायद्याच्या (Customs Duty) तरतुदींनुसार प्रथमदर्शनी कोणताही खटला चालवण्यात आलेला नाही, कारण तिच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमध्ये त्या गुन्ह्याचे आवश्यक घटक सिद्ध झाले नाहीत. दिशाला तिच्या वडिलांच्या गुन्ह्यांची माहिती होती याचा कोणताही पुरावा नाही.

भारतातील एका सिंडिकेटशी संगनमत करून परदेशातून आयात केलेली शस्त्रे मोठ्या नफ्यात विकण्यासाठी दिशाचे प्रमाणपत्र आणि परवाने वापरल्याचा आरोप तिच्या वडिलांवर होता. याशिवाय वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी या शस्त्रांचा वापर केल्याची तक्रारही करण्यात आली होती.

न्यायमूर्ती सौरभ बॅनर्जी म्हणाले की, याचिकाकर्ता ही २६ वर्षांची तरुण मुलगी आहे. तिचे भविष्य उज्ज्वल आहे. कायद्याच्या अभ्यासासोबतच शूटिंगच्या माध्यमातून ती तिच्या आकांक्षांना पंख देत आहे आणि देशाचे नाव उज्वल करत आहे. दिशाच्या वडिलांनी वाईट कृत्यांसाठी तिचा परवाना वापरला म्हणून तिला शिक्षा होऊ शकत नाही.

Daughter Cannot Be Punished For Father's Mistake Says Delhi High Court
मंदिर बांधल्याने कुणाच्या धार्मिक भावना दुखावत नाहीत; हाय कोर्टाचे निरीक्षण

बहुतेक भारतीय कुटुंबांमध्ये हे सामान्य आहे की पालक त्यांच्या मुलाच्या मागण्यांना पाठिंबा देण्याची आणि त्या पूर्ण करण्याची भूमिका घेतात. तसेच बहुतेक विद्यार्थी त्यांच्या पालकांवर अवलंबून असतात.

याचिकाकर्ती इतर विद्यार्थिनींप्रमाणेच तिच्या अभ्यासात आणि नेमबाजीच्या सरावात व्यस्त असावीत, असे न्यायालयाचे मत आहे. त्यामुळे तिच्या वडिलांनी त्याच्यासाठी शस्त्रे आणि दारूगोळा खरेदी करण्याची सर्व व्यवस्था करण्याचे मान्य केले असेल. असे मत न्यायाधीशांनी व्यक्त केले.

Daughter Cannot Be Punished For Father's Mistake Says Delhi High Court
अल्पवयीन मुलीच्या गर्भपातासाठी ओळखीचा पुरावा गरजेचा नाही; गैरप्रकार टाळण्यासाठी हाय कोर्टाचा निर्णय

महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) केलेल्या तक्रारीनुसार, 29 एप्रिल 2017 रोजी एका विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, दिशाच्या वडिलांसह तीन जणांना इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडण्यात आले होते.

याचिकाकर्तीच्या वडिलांनी बनावट पावत्या वापरून गुप्तपणे शस्त्रे आयात केली होती. यासाठी त्यांनी दिल्ली पोलिसांनी जारी केलेला शस्त्रास्त्र आणि दारूगोळा परवाना आणि नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) द्वारे जारी केलेले मार्क्समन प्रमाणपत्र वापरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com