Condom found in Students Sack
Condom found in Students Sack Dainik Gomantak
देश

Condom found in Students Sack: धक्कादायक! शाळेत विद्यार्थ्यांच्या दप्तरात चक्क कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या, सिगारेट...

Akshay Nirmale

Condom found in School Students Sack: बंगळूर येथील शाळेत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या शाळेत विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोबाईल फोन आणू नये, अशी सक्ती आहे. मोबाईल फोन आणला आहे की, नाही हे तपासण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींची दप्तरे तपासली असता त्यांना दप्तरात चक्क कंडोमसह, गर्भनिरोधक गोळ्या, सिगारेट अशा आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या.

बंगळूरमधील अनेक शाळांमध्ये विद्यार्थी मोबाईल फोन लपवून घेऊन येत असल्याचे प्रकार उघडकीस आले होते. त्यामुळे शाळा प्रशासनाने मुलांच्या दप्तराची तपासणी करण्यास सुरवात केली होती. कर्नाटकातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बोर्डाचे अधिकारी डी. शशी कुमार यांनी म्हटले आहे की, 80 टक्के शाळांमध्ये अशी दप्तर तपासणी मोहीम राबवली गेली. अनेक मुलांच्या दप्तरात गर्भनिरोधक गोळ्याही सापडल्या.

एका शाळेत इयत्ता 8 वी, 9 वी आणि 10 वीच्या मुलांच्या दप्तराची झडती घेतली गेली. तर त्यात मोबाईल सापडलेच. पण कंडोम सारखी वस्तू सापडल्याने सर्वचजणांना धक्का बसला आहे. या शाळेत मुलांच्या दप्तरात शिक्षकांना सिगारेट, लायटर, व्हाइटनर, रोख रक्कम सापडली. शिवाय काही मुला-मुलींच्या दप्तरातून गर्भनिरोधक गोळ्याही सापडल्या. मुलांच्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये दारूही आढळून आली आहे.

या प्रकारानंतर शिक्षकांनी तातडीने पालक बैठक घेतली. पालकांनीही मुलांच्या वर्तनात बदल झाल्याचे या बैठकीत सांगितले. आता शाळेतर्फे या सर्व विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले जाणार आहे. या मुलांना दहा दिवस सुट्टीही देण्यात आली आहे. काही मुला-मुलींच्या बाबतीत त्यांच्या खासगी कोचिंग क्लासमध्ये असे प्रकार घडल्याचे विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT