Rajnath Singh On Uniform Civil Code: समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली...

गुजरातसह 2024 मध्येही पुन्हा मोदी सरकारच सत्तेत येईल
Defense Minister Rajnath Singh
Defense Minister Rajnath Singh Dainik Gomantak

Rajnath Singh On Uniform Civil Code: देशात समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली आहे. सर्व राज्यांनी यावर विचार करावा. जी राज्ये हा कायदा लागू करतील, ते अभिनंदनास पात्र असतील, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केले आहे. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर झालेल्या एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

राजनाथ सिंग म्हणाले की, 2024 साठी एक वातावरण बनले आहे. केवळ गुजरातच नाही तर देशातही पुन्हा मोदी सरकार सत्तेत येईल. गुजरातमध्ये आम्ही जिंकणारच आहोत. पंतप्रधान देशभरात फिरत आहेत. किती कष्ट घेत आहेत. त्याचा परिणाम देशाची कामगिरी सतत चांगली होण्यात होत आहे. राहुल गांधींनी आत्ताच यात्रेला सुरवात केली आहे, पुढे पाहा काय होते ते.

Defense Minister Rajnath Singh
MP News: मनाचा मोठेपणा बघा! शिक्षिकेने हनुमान मंदिराच्या नावावर दान केली एक कोटींची मालमत्ता

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना रावणाशी केल्यावरून राजनाथ सिंग म्हणाले, त्यांचे वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. मर्यादा पाळली पाहिजे. ते काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यांना हे शोभत नाही. पंतप्रधान हे कुणा एकाचे नसतात. काँग्रेस पक्ष हताश आणि निराश झाला आहे. त्यामुळे ते पंतप्रधानांना टारगेट करत आहेत. ही त्यांची सवय आहे.

दरम्यान, भाजप नेते मनोज तिवारी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे डोळे फोडू अशी टीका केली होती, त्यावर राजनाथ सिंग यांनी, अशी भाषा चुकीची असल्याचे म्हटले आहे. राजकारणात भाषेला आणि वक्तव्याला मर्यादा असली पाहिजे. जर कुणी चुकीचे बोलत असेल तर ते चुकीचे आहे.

Defense Minister Rajnath Singh
Gujarat Assembly Election: गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील प्रचार थांबला; 89 जागांसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान

हिंदु-मुस्लीम असा भेदभाव आम्ही करत नाही तर काँग्रेस पक्ष करतो. त्यांना समजवा. मंदिरांसाठी पैसे का द्यायचे नाहीत? मंदिरे आमचा सांस्कृतिक वारसा आहेत. अँटी रेडिक्लायझेशन सेल बनवले पाहिजे, असेही सिंग म्हणाले. दरम्यान, श्रद्धा वालकर खून प्रकरणातील दोषीला कडक शिक्षा व्हायला हवी, असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com