MP News
MP NewsDainik Gomantak

MP News: मनाचा मोठेपणा बघा! शिक्षिकेने हनुमान मंदिराच्या नावावर दान केली एक कोटींची मालमत्ता

महिला शिक्षिका शिव कुमारी यांनी हनुमान मंदिराच्या नावे केली एक कोटींची मालमत्ता

मध्य प्रदेशातील श्योपूरमध्ये एका महिला शिक्षिकेने हनुमान मंदिराच्या (Hanuman) नावावर सुमारे एक कोटी रुपयांची संपत्ती दान केली आहे. त्यां महिलेने आपल्या दोन मुलांचा अधिकृत हिस्सा त्यांच्या नावावर दिला, त्यानंतर त्यांनी आपला हिस्सा मंदिराला दान केला. शिवकुमारी जदौन असे या महिला शिक्षिकेचे (Teacher) नाव आहे. ती विजयपूर परिसरातील खितरपाल गावातील सरकारी शाळेत शिक्षिका आहे.

समाज माध्यमाशी बोलतांना त्यांनी माहिती दिली की मला दोन मुले आहेत. मी माझ्या मुलांना त्यांचा वाटा दिला आहे. माझ्या वाट्याला येणारी मालमत्ता, घर आणि बँक बॅलन्स यासह मालमत्ता माझ्या स्वेच्छेने छिमछिमा हनुमान मंदिर ट्रस्टच्या नावावर केले आहे.

महिला शिक्षिका शिव कुमारी यांनी मृत्युपत्रात लिहिले की, माझ्या मृत्यूनंतर माझे घर आणि मालमत्ता मंदिर (Temple) ट्रस्टची होणार. बँक बॅलन्स आणि आयुर्विमा पॉलिसीमधून मिळालेल्या रकमेतून, सोने आणि चांदी मंदिर ट्रस्टचे असेल. त्यांच्या मृत्यूनंतर मंदिर ट्रस्टच्या लोकांनी एकत्रितपणे संस्कार करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांच्या संपत्तीमध्ये घर सरकारकडून मिळालेला पगार, आयुर्विमा पॉलिसीची रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने आणि सुमारे एक कोटी रुपयांची मालमत्ता यांचा समावेश आहे.

MP News
Gujarat Assembly Election: गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील प्रचार थांबला; 89 जागांसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान

जोपर्यंत त्या जिवंत आहे तोपर्यंत त्या घरातच राहणार आहे. त्यानंतर हे घर मंदिर ट्रस्टचे असेल. मिळालेल्या माहितीनुसार, शिव कुमारी लहानपणापासूनच देवाची पूजा करत असे. त्या पती आणि दोन्ही मुलांच्या वागण्याने दुखावली आहे. त्यांचा एक मुलगा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. पतीचे वागणेही योग्य नसल्याचे तिने सांगितले. या कारणास्तव त्यांनी मृत्युपत्रात असेही लिहिले आहे की, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाऐवजी मंदिर ट्रस्टच्या लोकांनी त्यांच्या मृतदेहाचे अंतिम संस्कार करावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com