Uma Bharti  Dainik Gomantak
देश

Madhya Pradesh Politics: दारुबंदीबाबत उमा भारतींनी घेतली कठोर भूमिका, शिवराज सरकार...

Madhya Pradesh Politics: मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांच्या राज्यात दारुबंदीवरुन सातत्याने गदारोळ होत आहे.

दैनिक गोमन्तक

Uma Bharti News: मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांच्या राज्यात दारुबंदीवरुन सातत्याने गदारोळ होत आहे. त्यांना अयोध्या आंदोलनाची वारंवार आठवण येत असतानाच ओरछामध्ये जे काही घडेल ते संपूर्ण मध्य प्रदेशासाठी एक उदाहरण ठरेल, असे त्या सांगत आहेत.

खरं तर, भाजपच्या (BJP) फायर ब्रँड नेत्या मानल्या जाणाऱ्या उमा भारतींनी (Uma Bharti) काही दिवसांपूर्वी बुंदेलखंडच्या ओरछा येथील एका दारुच्या दुकानात शेण फेकले होते. या घटनेनंतर दारुचे दुकान बंद झाले मात्र भाऊबीजेच्या दिवशी हे दुकान पुन्हा सुरु झाले.

उमा भारती संतापल्या

हे दुकान उघडलेले पाहून उमा भारती संतापल्या. यापूर्वी 27 ऑक्टोबर रोजी केलेल्या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या होत्या की, 'मला अयोध्येची खूप आठवण येते, लोकसभेच्या दोन जागांपासून ते अयोध्येने आम्हाला केंद्रात दोनदा बहुमताने सरकार (Government) बनवण्याची ताकद प्रदान केली. जेव्हा बाबरी पाडली तेव्हा ते बेकायदेशीर कृत्य मानले जात होते, आम्हाला गुन्हेगार मानले जात होते. शेवटी आमच्या गुन्ह्यावर आज भव्य राम मंदिर बांधले जात आहे.'

दुसरीकडे, उमा भारती यांनी नुकतीच घोषणा केली की, 'मी 7 नोव्हेंबरपासून घराचा त्याग करणार आहे. 7 नोव्हेंबर ते 14 जानेवारीपर्यंत मी घरामध्ये राहणार नाही. 7 नोव्हेंबरपासून जोपर्यंत लक्ष्य साध्य होत नाही तोपर्यंत....' राज्यात जोपर्यंत दारुबंदीबाबत धोरण तयार होत नाही तोपर्यंत मी घरात राहणार नाही, मी जंगलात राहीन, उघड्यावर राहीन, तंबूत राहीन, अशी घोषणा त्यांनी केली होती. मी धार्मिक स्थळी राहीन. मी नदीच्या काठावर किंवा झाडाखाली किंवा अयोग्य किंवा निषिद्ध ठिकाणी दारुच्या दुकानासमोर किंवा कंपाऊंडसमोर तंबू टाकून छोटी चौपाल टाकीन, असेही त्या म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mungul Gang Rivalry: गोव्यात खाकीचा दरारा संपला? गँगवॉर आणि वाढती गुंडगिरी चिंताजनक

Goa Live News: साखळी मतदारसंघात काँग्रेसमध्ये फूट?

Borim: गजेश नाईक दोन पिढ्यांपासून बनवतात घुमट, शामेळ; गणेशचतुर्थीत आरती पथकांकडून वाद्यांना मोठी मागणी

Goa Politics: खरी कुजबुज; ते 'सायब' खरेच निवडणुकीत उतरणार ?

क्रीडा विश्वात शोककळा, ऑलिंपिक पदक विजेत्या दिग्गज खेळाडूचं निधन; अशी होती त्यांची कारकीर्द

SCROLL FOR NEXT